Sambhajinagar News : ऐन दिवाळीत शेतमजुरांची आर्थिक कोंडी file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : ऐन दिवाळीत शेतमजुरांची आर्थिक कोंडी

लक्ष्मीपूजनासाठी पणत्या, बोळके बाजारात, दुष्काळामुळे खरेदीसाठी हात आखडता

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar News: Financial crisis of agricultural laborers during Diwali

बाबरा, पुढारी वृत्तसेवा : फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथील आठवडे बाजारात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या पणत्या, बोळके, लाह्या, बत्तासे आदी साहित्यांची खरेदी करताना नागरिक दिसून येत आहेत. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी व शेतमजुरांसमोर दिवाळी सण साजरा करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वर्षभरात एकदा येणारा दिवाळीचा सण आनंदाने साजरा करावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु आर्थिक संकट आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी व शेतमजुरांच्या आनंदावर विरजण पडले आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळाली असली, तरी भूमिहीन शेतमजुरांच्या पदरी मात्र अपेक्षित मदत पडलेली नाही.

भूमिहीन कुटुंबे रोजंदारीवर अवलंबून असल्याने त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर आठवडे बाजारात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पणत्या, बोळक आदींचे दुकाने थाटली आहे. दुष्काळाचा मोठा परिणाम झाला आहे. हाताला काम नसल्याने आणि उत्पन्नाचे साधन कमी झाल्याने दिवाळीचा सण साजरा करणेही त्यांच्यासाठी कठीण झाले आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळत असताना भूमिहीन शेतमजुरांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना या वर्गातून व्यक्त होत आहे.

भूमिहीनांच्या अडचणींकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना आर्थिक मदत व रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे. यंदाची दिवाळी शेतकरी आणि भूमिहीन शेतमजुरांसाठी आनंदापेक्षा चिंता आणि आर्थिक विवंचनेची ठरणार असल्याचे चित्र बाबरा परिसरात दिसून येत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT