

Save the fodder production on 3,000 hectares
मंठा, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील परतूर-मंठा परिसरात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, निम्न दुधना प्रकल्प परिसरातील सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्रावर चारा उत्पादनाचा पायलट प्रकल्प राबविण्यासाठी चारा उत्पादक शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा आणि सिंचनाची परवानगी द्यावी, अशी ठाम मागणी आमदार बबनराव लोणीकर यांच्या सह जिल्हाधिकारी यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे.
चारा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या खंडित करू नयेत, उपलब्ध पाण्याचा वापर करण्यास परवानगी द्यावी आणि संबंधित विभागांनी तातडीने समन्वय साधावा, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
दुष्काळाच्या संकटात पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी चारा उत्पादन हा प्रभावी उपाय ठरू शकतो. मात्र, शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभे केलेले चारा पीक वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे किंवा पाणी उपशास परवानगी न मिळाल्यामुळे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका बाजूला चारा टंचाईवर उपाययोजना करायच्या आणि दुसऱ्या बाजूला चारा उत्पादक शेतकऱ्यांचा वीजपुरवठा तोडायचा, हा विरोधाभास दूर करणे आवश्यक आवश्यक आहे. अ त्यामुळे चारा पिकांच्य पिकांच्या सिंचनासाठी अखंडित वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या निवेदनावर भाऊसाहेब गोरे, संदीप गोरे, अजय अवचार, पंजाबराव बोराडे, सतीशराव निर्वळ, मदन आवचार, संभाजी अवचार, वशिष्ठ अवचार, बाळासाहेब तौर यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या आहेत मागण्या निम्न दुधना प्रकल्पासह
जिल्ह्यातील इतर पाणी उपलब्ध असलेल्या प्रकल्प, तलाव, साठवण तलाव आणि जलस्रोतांमधून चारा उत्पादक शेतकऱ्यांना नियमानुसार पाणी घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी खंडित केलेल्या वीज जोडण्या तातडीने पूर्ववत कराव्यात, तसेच वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित करणे थांबवावे. जलसंपदा, कृषी, जलसंधारण व वीज वितरणने संयुक्तपणे नियोजन करून तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील चारा उत्पादनाच्या पायलट प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करावी,