Sambhajinagar News : मनपा शाळेलगतचे अतिक्रमण जमीनदोस्त file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : मनपा शाळेलगतचे अतिक्रमण जमीनदोस्त

मालकी हक्काची जागा नसताना बांधकाम केल्यामुळे गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar News: Encroachment near the municipal school destroyed

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या कांचनवाडी येथील शाळेत ३०० हून अधिक विद्यार्थी असून, या शाळेच्या संरक्षण भींतीला लागून एकाने अनधिकृत बांधकाम सुरू केले आहे. या बांधकामामुळे शाळेची भिंत धोकादायक बनली असून, बुधवारी (दि. १८) महापालिका अतिक्रमण हटाव विभागाला माहिती मिळताच पथकाने अनधिकृत बांधकामासह शेड जमीनदोस्त केले. त्यासोबतच मालकी हक्काची जागा नसताना बांधकाम केल्यामुळे गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

परिसरात कांचनवाडी महापालिकेची शाळा आहे. या शाळेजवळ शेख अक्रम व काही लोकांनी मिळून २० हजार चौरस फूट जागेवर अतिक्रमण केले होते. या जागेवर मातीचा भराव टाकण्यात आला. त्यामुळे मनपा शाळेच्या भिंतीला अगोदर तडे गेले. हळूहळू भिंत कोसळू लागली. शाळेची तीन बाजूची भिंत कोसळली.

शाळेतील मुलांच्या अंगावर ही भिंत को सळली नाही, ही सुदैवाची बाब आहे. याघटनेची माहिती मिळताच अतिक्रमण हटाव विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी पाहणी केली. अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला अगोदर मालकी हक्काची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. त्यांनी कागदपत्रे नसल्याची सांगितले.

मातीचा भराव टाकून वॉचमनसाठी एक रूमही तयार केली होती. ही रूम मनपाच्या पथकाने जमीनदोस्त केली. अतिक्रमण करणाऱ्यांवर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वाहुळे यांनी दिली. यावेळी वॉर्ड अधिकारी अर्चना राजपूत, उपअभियंता जावेद काझी, इमारत निरीक्षक मुकेश खडसे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT