Sambhajinagar Municipal election : भाजपसह दोन्ही शिवसेना स्वबळाच्या वाटेवर File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Municipal election : भाजपसह दोन्ही शिवसेना स्वबळाच्या वाटेवर

मनपासाठी वॉर्डनिहाय बैठकांना सुरुवात, नेत्यांसह इच्छुकही लागले कामाला

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar Municipal election BJP, Shiv Sena

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेसाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागताच सर्व राजकीय पक्षांनी देखील कंबर कसली आहे. महापालिका काबीज करण्याच्या दृष्टीने स्थानिक नेत्यांनी बैठकांचा सपाटा सुरू केला आहे. मात्र, तब्बल ३२ वर्षे महापालिकेवर एकत्रित सत्ता भोगलेल्या शिवसेना-भाजप युतीतील सेनेचे यंदा दोन गट पडले आहे.

त्यामुळे भाजपने या संधीचा फायदा घेत एकला चलो रेची तयारी सुरू केली आहे. तर दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील स्वबळाच्या दृष्टीनेच पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिका १९८२ साली अस्तित्वात आली. त्यानंतर सहा वर्षे महापालिकेवर प्रशासक राज राहिले. १९८८ साली पहिल्यांदा या महापालिकेसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत शहरात शिवसेनाही रिंगणात उतरली. सेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. तेव्हापासून महापालिका सेनेच्याच आहे.

भाजपसोबत ताब्यात सेनेने युती केल्यानंतर या दोन्हीसा नगरपालिका पक्षानेच महापालिकेवर ३२ वर्षे सत्ता गाजवली. परंतु, गेल्या ५ वर्षांमध्ये राज्याच्या राजकारणात मोठे भूकंप झाले. त्यात शिव सेनेचे दोन गट पडले. एक शिवसेना ठाकरे गट आणि दुसरा शिवसेना शिंदे गट निर्माण झाला. या दोन्ही गटांपैकी शिंदेसेनेने भाजपसोबत महायुती केली तर ठाकरे गटाने पहिल्यांदा भाजपला सोडचिठ्ठी देत दोन्ही कॉंग्रेससोबत आघाडी केली.

या गटामुळे यंदा महापालिका निवडणुकीचे चित्र देखील बदलण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुती-आघाडीतील भाजप आणि शिव सेना ठाकरे गट या दोन्ही पक्षांनी आपल्या गटातून बाहेर पडत महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेची ताकद दोन गटांत विभागल्याने या संधीचा फायदा घेत भाजपने महापालिकेवर एकहाती सत्ता आणण्याची तयारी केली आहे.

तर दुसरीकडे एमआयएमचा मुद्दा पुढे करीत शिवसेना शिंदे गटाने भाजपला एकटे जाण्यापासून रोखण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासोबतच गुप्तपणे स्वबळाची तयारी देखील केली आहे. तर एमआयएममुळे अगोदरच दोन्ही काँग्रेस अडचणीत आहेत. त्यामुळे ठाकरे गटाच्या स्थानिकांनीदेखील दोन्ही काँग्रेसला बाजूला ठेवून एकला चलोरेची रणनीती सुरू केल्याची चर्चा आहे.

एमआयएम हा जातीवादी पक्ष आहे. त्याला महापालिकेत येण्यापासून रोखायचे आहे. त्यासाठी आम्ही भाजपला महायुतीचा प्रस्ताव देणार आहोत. परंतु, त्यांनी जर स्वबळाचा विचार केला. तर आम्हीही तयार आहोत.
- राजेंद्र जंजाळ, जिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)
66 महापालिका निवडणुकीबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतली तो मान्य असेल. परंतु, आम्ही पक्षाला सांगितले की, आघाडी न करता स्वबळावर निवडणूक लढावी. कार्यकर्त्यांचीच तशी इच्छा असल्याचेही सांगितले आहे.
- राजू वैद्य, महानगरप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)
66 भाजपमध्ये मागील दहा वर्षांत विविध पक्षांतून अनेकांनी प्रवेश केला असून ही इनकमिंग सुरूच आहे. त्यामुळे प्रत्येक इच्छुक कार्यकर्त्यांना महापालिकेत संधी मिळावी, अशी आमची अपेक्षा आहे.
- किशोर शितोळे, शहराध्यक्ष, भाजप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT