Chhatrapati Sambhajinagar Water Supply  pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Water Supply : मुख्य जलवाहिनीवरील १९ अनधिकृत नळजोडण्या खंडित

हसूल तलावातून पाणी चोरीसाठी वापरण्यात येणारे पाइपही जप्त : मनपाची धडक मोहीम

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासह पाण्याची चोरी आणि अपव्यय रोखण्यासाठी महापालिकेने आता कठोर पावले उचलली आहेत. मनपाच्या विशेष शोध पथकाने जिन्सी पोलिस ठाण्यासमोरील ५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील १९ अनधिकृत नळजोडण्या खंडित केल्या. तसेच हर्सल तलावातून विनापरवाना पाणी उपसण्यासाठी वापरण्यात येणारी पाइपही जप्त केली. या कारवाईमुळे अनधिकृतपणे पाणी घेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

जिन्सी पोलिस ठाण्यासमोरील परिसरातून जाणाऱ्या ५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर अनधिकृत नळजोडण्या करून मोठ्या प्रमाणात पाणी घेतले जात असल्याची माहिती मनपा प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार विशेष शोध पथकाने संबंधित परिसरात तपासणी केली.

या वेळी अनधिकृत जोडण्या आढळून आल्याने पथकाने तातडीने कारवाई करत सर्व १९ जोडण्या जागेवरच खंडित केल्या. त्यामुळे मुख्य जलवाहिनीतून होणारी पाणीचोरी रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच दुसऱ्या कारवाईत हसूल तलाव परिसरातून विनापरवाना पाणी घेतले जात असल्याचे आढळले.

पाणी उपसण्यासाठी वापरण्यात येणारे पाइप मनपाच्या पथकाने जप्त केले. यासह तलावातून अनधिकृतपणे पाणी घेण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ही कारवाई केली. दरम्यान, मुख्य जलवाहिनीतून पाणीचोरी आणि तलावातून विनापरवाना पाणी उपसण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे. आगामी काळात संपूर्ण शहरात ही शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

पाणी चोरीविरोधात मनपाची मोहीम

  • मुख्य जलवाहिनीवरील १९ अनधिकृत नळजोडण्या खंडित

  • हर्मूल तलावातून पाणी उपसणारी पाइप जप्त-पाणीचोरी आणि अपव्यय रोखण्यासाठी विशेष शोध पथक सक्रिय

  • शहरभर शोधमोहीम तीव्र करण्याचा मनपा प्रशासनाचा इशारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT