Sambhajinagar FDA Action : लासुरात १५ लाखांचे खाद्यतेल जप्त

लासुरात १५ लाखांचे खाद्यतेल जप्त
Sambhajinagar FDA Action
तेलाच्या कारखान्यावर कारवाई करत एफडीएने तेलसाठा जप्त केला.pudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर / लासूर स्टेशन : लासूर स्टेशन येथील मेसर्स पोल अॅग्रो इंडस्ट्रीज (ऑईल रिपॅकिंग युनिट) वर धडक कारवाई करत गुरुवारी (दि.१५) तब्बल १५ लाखाहून अधिक किमतीचे रिफाइंड सोयाबीन तेल जप्त करण्यात आले. या कंपनीचा अन्न परवानाही एफडीएकडून निलंबित करण्यात आला आहे.

सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र या मोहिमेंतर्गत खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी एफडीएकडून धडक कारवाई सुरू आहे. गुरुवारीअन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा प्रमोद सुरसे यांच्या पथकाने गुरुवारी जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील पोल अॅग्रो इंडस्ट्रीज या कारखान्याची अचानक तपासणी केली. या तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा मानकांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाल्याचे व गंभीर त्रुटी आढळून आल्या. यात कारखान्यात कच्च्या व तयार तेलाची कोणतीही प्रयोगशाळा चाचणी उपलब्ध नव्हती. पूर्णवेळ तांत्रिक व्यक्ती कार्यरत नव्हती.

Sambhajinagar FDA Action
Chhatrapati Sambhajinagar Water Supply : सातारा देवळाईसह नो नेटवर्क भागांना नवीन वर्षात पाणी

फरशी तेलकट-चिकट होती, मशिनरी आणि भिंतींवर तेलाचे थर जमा झाले होते. मॅन्युफॅक्चरिंग एरियामध्ये अन्न कचरा पडून होता. भिंतींचे प्लास्टर आणि रंग उखडलेले होते आणि कीटक प्रतिबंधक कोणतीही यंत्रणा कार्यरत नव्हती. पाण्याची अर्धवार्षिक तपासणी केली नव्हती. तसेच पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे साहित्य फूड-ग्रेड असल्याचे कोणतेही वैध प्रमाणपत्र नव्हते. त्यामुळे कंपनीतील ९,१६५ किलो तेलसाठी किंमत १५,०२,५०० रुपये जप्त करण्यात आला.एफडीएच्या या धडक कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

तेलाचे नमुने प्रयोगशाळेत

अन्न सुरक्षा कायदा, २००६ च्या कलम ३८(१) (सी) अंतर्गत जप्त केलेला सर्व साठा सील करून पुढील आदेशापर्यंत सुरक्षित ताब्यात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जप्त केलेल्या तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येत असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कडक कायदेशीर आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी माहिती श्रीकांत करकळे, सह आयुक्त यांनी दिली आहे.

Sambhajinagar FDA Action
Powai Lake Water: पवई तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरणार!महापालिका तांत्रिक बाबी तपासणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news