SSC HSC Exam 2027 : आता 'झोन पद्धती' : 'होम सेंटर' होणार बंद

दहावी-बारावीच्या परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी उपाययोजना
SSC HSC Exam  2027
SSC HSC Exam Time Table 2027pudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये परीक्षा केंद्रांवर होणाऱ्या गैरप्रकारांना व कॉपीच्या घटनांना पूर्णपणे आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने यंदा कडक पावले उचलली आहेत. याअंतर्गत परीक्षा केंद्रांच्या रचनेमध्ये मोठा बदल करण्यात येत असून, जवळच्या शाळांचे विशिष्ट 'झोन' तयार करून केंद्रे निश्चित केली जाणार आहेत.

याशिवाय यंदा विद्यार्थ्यांना 'होम सेंटर' (गृहकेंद्र) कुठेही दिले जाणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. केवळ दुर्गम भागांत पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्यास अपवाद म्हणून गृहकेंद्र ठेवले जाईल,

SSC HSC Exam  2027
Rajinikanth Jailer 2 : वयाच्या पंच्याहत्तरीतही थलायवाची क्रेझ, तमिळ सुपरस्टारसमोर अनेक चित्रपट फुस्स..

अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी दिली. केंद्रांची संख्या नियंत्रित करून गैरप्रकारांवर वचक निर्माण करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. यंदा जिल्हा परिषदेच्या सुमारे ४५ शाळा दहावीच्या परीक्षा केंद्रांसाठी निश्चित करण्याचे नियोजन आहे. एका हॉलमध्ये २५ विद्यार्थी बसविण्याच्या नियमामुळे पुरेशा खोल्या आणि आवश्यक भौतिक सुविधा असलेल्या शाळांनाच प्राधान्य दिले जाईल.

मागील वर्षी जिल्ह्यात बारावीसाठी १६७ आणि दहावीसाठी २३४ केंद्रे होती. यंदा झोन पद्धतीमुळे लगतची चार-पाच केंद्रे एकत्र करून मोठ्या केंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात येईल. यामुळे केंद्रांची संख्या कमी होऊन भरारी पथकांना देखरेख करणे अधिक सुलभ होईल.

SSC HSC Exam  2027
Bus Staff Accommodation Problems : काहींना आरामांची सुविधा, काहींचा बसमध्येच मुक्काम

कारवाई झालेली दोन केंद्रे कायमस्वरूपी बंद मागील परीक्षेत गैरप्रकार आढळलेल्या बारावीच्या ७ आणि दहावीच्या ५ केंद्रांवर कारवाई करण्यात आली होती. त्यापैकी चापानेर आणि जैतापूर येथील दोन केंद्रे कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहेत, तर काहींवर तात्पुरती बंदी घातली आहे. सध्या नवीन केंद्रांची पाहणी सुरू असून लवकरच अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news