Municipal administration action pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar News : महाराणाची मिनी ट्रेन, बोटिंग आता बंद होणार

मनपा आयुक्तांचा निर्णय, २० कोटींची देणी थकवली

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेला कंत्राटी तत्त्वावर दीड ते दोन हजार मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या महाराणा एजन्सीने वेतनापोटी प्राप्त जास्तीचे २० कोटी रुपये नोटीस बजावूनही परत केले नाही. त्यामुळे महापालिकेने आता या एजन्सीचे इतरही कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला असून त्यात बॉटनिकल उद्यानातील बोटींग आणि तीन उद्यानातील मिनी ट्रेनचा समावेश आहे.

महापालिकेला कंत्राटी तत्त्वावर तब्बल १६ वर्षे महाराणा एजन्सीने मनुष्यबळ पुरविण्याचे काम केले. या कामासाठी महापालिकेत तीन एजन्सी कार्यारत होत्या. परंतु, त्यापैकी सर्वाधिक मनुष्यबळ पुरवठा करण्याचे काम हे महाराणा एजन्सीकडेच होते. या एजन्सीचे तब्बल कामगार होते.

महापालिकने काही वर्षांमध्ये वाढीव भत्त्यापोटी अदा केलेल्या वेतनात जास्तीचे २२ कोटी रुपये या तिन्ही एजन्सींना अदा केल्याची माहिती लेखापरिक्षणातून पुढे आली. त्यावरुन महापालिकेने वसूलीसाठी तिन्ही एजन्सींना नोटीस बजावली. परंतु, महाराणा वगळता दोन्ही एजन्सींनी अतिप्रधान रक्कम परत केली.

सर्वाधिक २० कोटी रुपयांची अतिप्रधान रक्कम ही महाराणाकडे होती. ही रक्कम अद्यापही कंत्राटदाराकडून परत करण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिकेने आता या एजन्सीचे इतरही कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला असून त्यात बॉटनिकल उद्यानातील बोटींग आणि सिद्धार्थ उद्यानासह इतर दोन अशा तीन उद्यानातील मिनी ट्रेनचे कंत्राटही रद्द केले जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT