Sambhajinagar Local body elections: BSP
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्षाने तयारी सुरू केली असून, सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष अॅड. सुनील डोंगरे यांनी गुरुवारी (दि.१३) पत्रकार परिषदेत केली.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्त अॅड. डोंगरे शहरात आले होते. पत्रकार भवन येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी निवडणुकीची तयारी दीड वर्षापासून सुरू असून, २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायती स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले.
महायुती आणि महाविकास आघाडीने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पाळले नाही. त्या विरोधात आंदोलन करणार, तसेच महार वतनाची जमीन बळकवल्याप्रकरणी हाय कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचेही सांगितले.
या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रभारी मुकुंद सोनवणे, संतोष शिंदे, मनीष कावळे, गौतम पारखे, पंडित बोर्डे, विजय बचके, अमोल पवार, सचिन महापुरे, राघोजी पुंडगे, विष्णू वाघमारे, अनिल गवळे, पुलज राजगिरे, राहुल साबळे, सुनील पटेकर यांची उपस्थिती होती. यावेळी रिपाइंचे शिवाजी बागुल, प्रमोद ढाले, नानासाहेब म्हस्के, अॅड. विक्रम गोखले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी बसपात प्रवेश केला.