

Young man beaten and robbed, Rs 5,000 taken on PhonePe
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याने लूटमार, चोरी, मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. तरुणाला दुचाकीवर आलेल्या दोघांनी हातातील कड्याने डोक्यात, तोंडावर जबर मारहाण करून लुटले.
फोनपेवर त्याच्याकडून ५ हजार रुपये घेऊन धमकावले. हा प्रकार मंगळवारी (दि.११) रात्री सव्वानऊ ते दहाच्या दरम्यान टिळकनगर भागात घडला.
फिर्यादी अनिकेत अर्जुनसिंग चव्हाण (४२, रा. प्रतापनगर) याला आरोपींनी अंकुश प्रसूतिगृह रुग्णालयासमोर, रोपळेकर चौक येथे विनाकारण दुचाकीवर आलेल्या (एमएच-२०-जीटी-४०२२) मारहाण सुरू केली.
हातातील कड्याने त्याच्या डोक्यात, तोंडावर, हनुवटीवर मारून जखमी केले. आमच्या नादी लागलास तर तुला अजून मारू, अशी धमकी दिली. तुझी गाडी परत देणार नाही, ती फोडून टाकू, असे धमकावत त्याच्याकडून फोनपेवर ५ हजार घेऊन दोन्ही लुटारूंनी तेथून धूम ठोकली. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.