Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : दंडमाफीचा निर्णय, गुंठेवारी विभागात गर्दी

अॅन्सलरी, मार्जिनसाइडचा दहा टक्के दंड माफ : नियमितीकरणासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : गुंठेवारी नियमितीकरणासाठी आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त दंडातून नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्यानंतर महापालिकेच्या संबंधित विभागात अर्जदारांची गर्दी वाढली आहे. अॅन्सलरी आणि मार्जिनसाइडसाठी आकारण्यात येणारा प्रत्येकी दहा टक्के दंड माफ करण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने घेतल्यानंतर गुंठेवारी नियमितीकरणाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. दंडमाफीमुळे नियमितीकरणासाठी लागणारी एकूण रक्कम कमी झाल्याने नागरिकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

महापालिकेच्या २५ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाकडून अॅन्सलरी आणि मार्जिनसाइडचा दहा टक्के दंड माफ करण्याचा ठराव ठेवण्यात आला होता. हा ठराव या सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे गुंठेवारी नियमित करण्यासाठी नागरिकांना पूर्वीच्या तुलनेत कमी रक्कम भरावी लागणार आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा निर्णय म्हणून या दंडमाफीकडे पाहिले जात आहे. तसेच गुंठेवारी नियमितीकरणासाठी यापूर्वी आकारण्यात येणाऱ्या शुल्कासोबत अॅन्सलरी आणि मार्जिनसाइडच्या प्रत्येकी दहा टक्के दंडाचा भार नागरिकांवर पडत होता.

हे दोन्ही दंड माफ झाल्यामुळे नियमितीकरणासाठी लागणारी रक्कम मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून नियमितीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मालमत्ताधारकांना दिलासा मिळाला आहे. दंडमाफीच्या या निर्णयानंतर गुंठेवारी विभागात नियमितीकरणासाठी चौकशी, कागदपत्रांची पूर्तता आणि अर्ज दाखल करण्यासाठी नागरिकांची वर्दळ वाढली आहे.

तसेच मुदतीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नागरिकांकडून लगबग सुरू झाली असून, महापालिका विभागाकडूनही अर्जाची प्रक्रिया करण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान, गुंठेवारी नियमितीकरणासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे दंडमाफीचा लाभघेण्यासाठी नागरिकांकडे मर्यादित कालावधी असल्याने उपलब्ध संधीचा लाभ घेण्यासाठी मालमत्ताधारकांची धावपळ सुरू झाली आहे.

नारेगावातील शिबिराला उत्तम प्रतिसाद

महापालिकेच्या वतीने नारेगाव येथे मागीलदोन दिवसांपासून गुंठेवारी शिबीर घेण्यात येत आहे. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून अनधिकृत प्लॉट्सवर सुरू असलेल्या कारवाईमुळे नागरिक गुंठेवारी करून घेण्यासाठी पुढे येत आहेत. मागील दोन दिवसांत सुमारे ५००-६०० जणांनी शिबिरात येऊन माहिती घेतली. तर ९० जणांनी गुंठेवारीसाठी आपल्या मालमत्तेची कागदपत्रे आर्किटेक्टकडे जमा केली आहेत. हे शिबीर आज बुधवारी (दि.२) देखील सुरू राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT