Sambhajinagar Traffic News : शहरात हेल्मेट सक्तीच्या पहिल्याच दिवशी तब्बल चार हजार दुचाकीस्वारांवर कारवाई

नियम पाळणाऱ्यांना गुलाब, मोडणाऱ्यांना थेट पावती; ४० लाखांचा आकारला दंड
Sambhajinagar Traffic News
विनाहेल्मेट दुचाकी चालकाला वाहतूक पोलिसांनी असे चौकाचौकांत थांबून थेट दंडाच्या पावत्या दिल्या. (छाया : सचिन लहाने)
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहरात प्राणांतिक अपघातांचे सत्र रोखण्यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार, मंगळवारी (दि. १ सप्टेंबर) पहिल्याच दिवशी हेल्मेट सक्तीची अत्यंत कडक अंमलबजावणी करण्यात आली. वाहतूक शाखा आणि सर्व पोलिस ठाण्यांच्या संयुक्त पथकांनी राबवलेल्या धडक मोहिमेत विना हेल्मेट फिरणाऱ्या तब्बल ४ हजार १२० दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करत ४० लाख ९३ हजार रुपयांचा दंड आकारला. या कारवाईमुळे वाहनचालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

शहरात होणाऱ्या प्राणांतिक अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण ६० ते ७० टक्के हे केवळ दुचाकीस्वारांचे आहे. अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने सर्वाधिक बळी जातात. हे मृत्यू रोखण्यासाठी पोलिस आयुक्तांनी १ सप्टेंबरपासून शहरात हेल्मेट सक्तीची धडक मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सकाळी आणि संध्याकाळी अशी दोन टप्प्यांत ही कारवाई करण्यात आली.

Sambhajinagar Traffic News
Sambhajinagar Crime | समृद्धी दरोडा प्रकरण : दोन पोलिस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी उचलबांगडी

ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पवन चौधरी, रेखा लोंढे, नीतू तायडे, सहायक निरीक्षक रवी गच्चे, सचिन मिरधे तसेच सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली.

हेल्मेट हे केवळ पोलिसांच्या दंडापासून वाचण्यासाठी नसून, स्वतःच्या मौल्यवान जीवनाच्या रक्षणासाठी आहे. यापुढे विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाईची ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

Sambhajinagar Traffic News
Nanded Accident | नांदेड : भरधाव वाहनाच्‍या धडकेत २३ वर्षीय लॉच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

अशी झाली कारवाई

  • मंगळवारी सकाळी ११ ते १ आणि 1 सायंकाळी ५ ते ७ या या वेळेत शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.

  • हसूल टी पॉइंट, मुकुंदवाडी चौक, केंब्रिज चौक, हायकोर्ट सिग्नल, सेव्ह सेव्हन हिल, दर्गा चौक, क्रांती चौक, महावीर चौक, नगर नाका, ए.एस. क्लब चौक, कामगार चौक अशा विविध प्रमुख ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली.

  • चार तासांच्या दोन टप्प्यांत राबविलेल्या मोहिमेत विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ४,१२० जणांवर केसेस करण्यात आल्या आणि त्यांच्याकडून ४० लाख ९३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. यापैकी २७ हजार रुपये दंड जागीच वसूल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news