Sambhajinagar illegal plotting : हर्सूलमधील अनधिकृत प्लॉटिंगवर सलग दुसऱ्या दिवशी कारवाई

भूमाफियांना दणका, ७०० प्लॉट्सच्या हद्दी-खुणा उद्ध्वस्त : ६५ पक्क्या घरांना नोटिसा
Sambhajinagar illegal plotting
महापालिका अतिक्रमण विभागाकडून सलग दुसऱ्या दिवशी हसूल येथील अनधिकृत प्लॉटिंगवर बुलडोजरने कारवाईवेळी उपस्थित अधिकारी.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : अनधिकृत प्लॉटिंगद्वारे शहराच्या सुनियोजित विकासाला सुरुंग लावणाऱ्या भूमाफियांविरोधात महापालिकेने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.१) हर्मूल परिसरात पथकाकडून धडक कारवाई करत गट क्रमांक २७५, ६१ आणि २७मधील सुमारे ७०० प्लॉट्सच्या हद्दी व खुणा बुलडोझरच्या साहाय्याने मिटविण्यात आल्या. यासह गट क्रमांक २७ मधील सुमारे ६५ पक्क्या घरांच्या मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी दिली.

महापालिकेच्या अतिक्रमण गाच्या पथकाने हसूल गट क्रमांक २७५ मध्ये पहिली मोठी कारवाई केली. यात ४.५ एकर क्षेत्रावर दादासाहेब औताडे, महादेव वाणी आणि रवींद्र औताडे यांनी केलेल्या अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणी सुमारे ४०० प्लॉट्सच्या हद्दी व खुणा करण्यात आल्या होत्या. या सर्व खुणा आणि हद्दी महापालिकेच्या पथकाने नष्ट केल्या. त्यानंतर गट क्रमांक ६१ मधील ३.५ एकर क्षेत्रावर शेख रिजवान शेख रियाज व इतरांनी केलेल्या प्लॉटिंगवर कारवाई करण्यात आली.

Sambhajinagar illegal plotting
Chhatrapati Sambhajinagar News : मनपाच्या १०० बालवाडी शिक्षिकांना मुदतवाढीचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव

येथे सुमारे २९० प्लॉट्सची मार्किंग करण्यात आली होती. ही मार्किंग आणि हद्दीही जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आल्या. तसेच गट क्रमांक २७ मध्ये सुरेंद्र कोलते यांच्या संबंधित पाच रिकाम्या प्लॉट्सवरील मार्किंग नष्ट करण्यात आली. याच ठिकाणी सुमारे ६५ पक्की घरे उभारण्यात आली आहेत. संबंधित नागरिकांना महापालिका पथकाकडून नोटिसा बजावण्यात आल्या असून, अनधिकृत बांधकामांवर पुढील कारवाईची शक्यता आहे. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशाने, संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त उदय मानवतकर, संजय सुरडकर, इमारत निरीक्षक संतोष वाचासुंदर, रवींद्र देसाई यांच्यासह अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, नागरी मित्र पथकाचे जवान, तीन जेसीबी आणि तीन हायवा ट्रकच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली.

दरम्यान, मागील आठवडाभरात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हर्मूलसह देवळाई-चिकलठाणा, पहाडसिंगपुरा-मिटमिटा आणि हनुमान टेकडी परिसरातील अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई केली आहे. विविध गट क्रमांकांवरील प्लॉटच्या हद्दी आणि खुणा हटविण्यासोबतच काही प्रकरणांत संबंधितांविरुद्ध पोलिसांत गुन्हेही दाखल झाले आहेत. यासह देवळाई-चिकलठाणा येथील गट क्रमांक ५३ ते ५६ तसेच पहाडसिंगपुरा-मिटमिटा परिसरातील कारवाईचा त्यात समावेश आहे.

मनपा आयुक्त महसूल, नोंदणी अधिकाऱ्यांची आज बैठक

शहरातील अनधिकृत प्लॉटिंगला लगाम घालण्यासाठी मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवारी (दि.२) सकाळी १० वाजता मनपा मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. यात शहरातील अनधिकृत प्लाटिंगविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी महसूल व नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यावर बैठकीत चर्चा होणार आहे. यासाठी उपजिल्हाधिकारी, अपर तहसीलदार तसेच सर्व दुय्यम निबंधकांना उपस्थित राहण्याचे पत्र मनपाच्या अतिक्रमण विभागाने दिले आहे. अनधिकृत प्लॉटिंगच्या व्यवहारांना आळा घालण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वयाची यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीनेही बैठकीला महत्त्वाची मानली जात आहे.

Sambhajinagar illegal plotting
Sambhajinagar Traffic News : शहरात हेल्मेट सक्तीच्या पहिल्याच दिवशी तब्बल चार हजार दुचाकीस्वारांवर कारवाई

गुंठेवारी करून घेण्याचे आवाहन

हसूलमधील कारवाईदरम्यान महापालिकेच महापालिकेच्या वतीने वाहनाद्वारे परिसरात गुंठेवारी करून घेण्याबाबत उद्घोषणा करण्यात आली. ३१ ऑक्टोबरपर्यंत गुंठेवारी करून न घेतल्यास महापालिकेतर्फे कारवाई करून मालमत्ता निष्कासित करण्यात येईल, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले. तसेच अनधिकृत भूखंडांची विक्री करून नागरिकांची फसवणूक करण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी कारवाई अधिक तीव्र होण्याचे संकेत आहेत. प्लॉटिंग करून रस्ते, हद्दी आणि खुणा तयार करणाऱ्यांसह त्यानंतर बांधकाम करणाऱ्यांवरही प्रशासनाची नजर असून, पुढील काळात अशा ठिकाणी कारवाईचा फास आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे.

चारही बाजूंनी कारवाईचा फास

महापालिका अतिक्रमण पथकाने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून पथकाने आतापर्यंत हर्मूलसह देवळाई-चिकलठाणा, पहाडसिंगपुरा-मिटमिटा आणि हनुमान टेकडी परिसरातील अनधिकृत प्लॉटिंग उध्वस्त केली आहे. प्लॉटच्या हद्दी व खुणा नष्ट करण्याबरोबरच काही प्रकरणांत महापालिकेकडून पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्लॉटिंगधारकांवरील कारवाईचा फास आता अधिक घट्ट होत असल्याचे या कारवाईवरून दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news