'कोबाल्ट बॅकीथेरपी युनिट' कर्करोग रुग्णालयात दाखल pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Cancer Hospital : कोबाल्ट बॅकीथेरपी युनिटमुळे कर्करुग्णांच्या उपचारांना मिळणार बळ

शासकीय कर्करोग रुग्णालयात लवकरच होणार कार्यान्वित

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर: कर्करोगाच्या उपचारांमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'कोबाल्ट बॅकीथेरपी युनिट' शासकीय कर्करोग रुग्णालयात दाखलझाले आहे. 'एईआरबी' कडूनही या संयंत्राव्दारे कर्करुग्णांना किरणोपचार सेवा देण्यासाठी परवानगी मिळाली आहे. सध्या संयंत्राचा वापर व हाताळणीबाबतचे प्रशिक्षण (ट्रेनिंग) आणि मायनर ओटीची तयारी पूर्ण झाली असून, लवकरच हे संयंत्र प्रत्यक्ष रुग्णसेवेसाठी कार्यान्वित केले जाणार आहे. यामुळे कर्करुग्णांना वरदान ठरणारी आधुनिक आणिदर्जेदार उपचारपद्धती आतास्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे.

या अत्याधुनिक यंत्रणेसाठी शासनाकडून ३ कोटी ७१ लाख ७७ हजार २०० रुपयांची प्रशासकीय मान्यता ३० ऑक्टोबर २०२३ रोजीदेण्यात आलीहोती. त्यानंतर १२ जुलै २०२४ रोजी खरेदी आदेश जारी करण्यात आला होता. कोबाल्ट बॅकीथेरपी ही कर्करोगाच्या उपचारासाठी वापरली जाणारी अंतर्गत किरणोत्सर्ग उपचारपद्धती आहे.

यामध्ये कोबाल्ट-६० या किरणोत्सर्गी स्रोताचा वापर करून थेट शरीरातील ट्यूमरच्या ठिकाणी किरणोत्सर्ग दिला जातो. पारंपरिक बाह्य किरणोत्सर्ग उपचारपद्धतीमध्ये शरीराच्या बाहेरूनमशीनद्वारे किरणोत्सर्गदिला जातो. याउलट, बॅकीथेरपीमध्ये विशेष अॅप्लिकेटरच्या साहाय्याने किरणोत्सर्गी स्रोतट्यूमरच्याजवळ किंवा थेटत्यामध्येच ठेवला जातो. यामुळे ट्यूमरला अचूक आणि आवश्यक उपचारमात्रा देता येते, तर आसपासच्या निरोगी अवयवांना होणारा किरणोत्सर्ग तुलनेने खूप कमी होतो. या पद्धतीचा वापर प्रामुख्याने गर्भाशयमुखाचा कर्करोग तसेच निवडक प्रकरणांमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी केला जातो.

उपचारमात्रा कमी वेळेतच पूर्ण

कोबाल्ट-६० या स्रोताची वारंवार बदली करण्याची आवश्यकता भासत नाही. यामुळे रुग्णालयाच्या दीर्घकालीन खर्चावर नियंत्रण ठेवण्यास मोठी मदत होते. तसेच एचडीआर बॅकीथेरपीमध्ये उच्च डोस दराने किरणोत्सर्ग दिला जातो. त्यामुळे नियोजित उपचारमात्रा कमी वेळेतच पूर्ण करता येते. हे अत्याधुनिक संयंत्र कार्यान्वित करण्यासाठी डॉ. कैलास शर्मा, घाटी तथा शासकीय कर्करुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, ओएसडी डॉ. अरविंद गायकवाड, किरणोपचार विभागप्रमुख डॉ. बालाजी शेवाळकर यांनी विशेष योगदान दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT