Sambhajinagar Crime : नशेसाठी दुचाकी चोरणारे दोघे, विल्हेवाट लावणारा गॅरेजचालक गजाआड

५० सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा छडा; आठ दुचाकी जप्त, अडीच हजारांत विक्री
Sambhajinagar Crime
Sambhajinagar Crime pudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : नशेसाठी पैसे मिळविण्याकरिता दुचाकी चोरणाऱ्या दोन बांधकाम मजुरांसह चोरीच्या दुचार्कीची विल्हेवाट लावणाऱ्या गॅरेजचालकाला सिडको पोलिसांनी अटक केली. एमजीएम आणि सिडको परिसरातून चोरी केलेल्या आठ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी परिसरातील ५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. शेख जुनेद शेख समी (२४, रा. माणिकनगर, नारेगाव), परवेज सय्यद आमीर (२५, रा. दानिश पार्क, नारेगाव) आणि गॅरेजचालक शेख जमीर शेख लतीफ (२८, रा. पटेल कॉलनी, नारेगाव, मूळ रा. वसमत, जि, हिंगोली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी ही माहिती दिली.

एमजीएम आणि सिडको परिसरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने पोलिस आयुक्त प्रवीण उपआयुक्त रत्नाकर नवले आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. १७ ऑक्टोबर रोजी उपनिरीक्षक अनिल नाणेकर यांचे पथक गस्तीवर असताना, एमजीएम परिसरातून चोरी केलेली दुचाकी घेऊन एक तरुण सनी सेंटरच्या मोकळ्या मैदानाकडे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून जुनेद शेख याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.

Sambhajinagar Crime
Graduate Constituency Election 2026 : पदवीधर निवडणूक : मतदानासाठी १,१६५ पोलिसांचा फौजफाटा

हँडल लॉक तोडून दुचाकी लंपास

पोलिसांनी चौकशी केली असता, जुनेदने साथीदार परवेजचे नाव सांगितले. त्यालाही ताब्यात घेऊन एक चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली. दोघेही बांधकाम मजूर असून, नशेच्या व्यसनासाठी पैसे कमी पडू लागल्याने त्यांनी दुचाकी चोरण्यास सुरुवात केली होती. रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकींचे हँडल लॉक तोडून त्या उतारावरून ढकलत न्यायच्या. काही अंतरावर गेल्यानंतर गाडी बंद पडल्याचा बहाणा करून वायरमध्ये छेडछाड करत दुचाकी सुरू करायची आणि पसार व्हायचे, अशी त्यांची पद्धत होती. चोरलेल्या दुचाकी ते नारेगावात गेल्या सात ते आठ वर्षांपासून गॅरेज चालवणाऱ्या जमीरला अवघ्या अडीच हजार रुपयांत विकत असत. जुनेद आणि परवेज यांनी जमीरला आतापर्यंत १२ दुचाकी दिल्याचे तपासात समोर आले आहे.

भोकरदन, सावंगी बायपास परिसरातून जप्ती

गॅरेजचालक जमीरला अटक करून त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. भोकरदन परिसरातील ओळखीच्या व्यक्तींना विकलेल्या दोन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. तसेच, जुनेदने सावंगी बायपास रस्त्यालगतच्या झुडपांत लपवून ठेवलेल्या आणखी दोन दुचाकी जप्त केल्या. अशा प्रकारे एकूण आठ दुचाकी पोलिसांच्या हाती लागल्या. उर्वरित दुचाकी जमीरने भंगारात तोडून त्यांची विल्हेवाट लावल्याचा संशय आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अनिल नाणेकर, हवालदार मंगेश पवार, सहदेव साबळे, अमोल अंभोरे, नरेश भोंडे आणि अतुल सोळंके यांच्या पथकाने केली.

Sambhajinagar Crime
Sakinaka fire Mumbai: साकीनाक्यातील आगीत दोघांचा होरपळून मृत्यू; चौघे जण गंभीर, रस्त्यावरील दोन दुचाकी, टेम्पोही भक्ष्यस्थानी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news