Sakinaka fire Mumbai: साकीनाक्यातील आगीत दोघांचा होरपळून मृत्यू; चौघे जण गंभीर, रस्त्यावरील दोन दुचाकी, टेम्पोही भक्ष्यस्थानी

खैराणी रोडवरील अब्दू रशीद कंपाऊंडमध्ये भीषण आग; दोन दुचाकी आणि टेम्पो जळाले, मध्यरात्री आग आटोक्यात
Sakinaka fire Mumbai
Sakinaka fire MumbaiPudhari
Published on: 
Updated on: 

​मुंबई: अंधेरी पूर्व येथील साकीनाका, खैराणी रोडवरील एका व्यावसायिक व निवासी संकुलाला मंगळवारी सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले.

जखमींवर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही भीषण आग आटोक्यात आणली.

Sakinaka fire Mumbai
Mumbai RTI Accident Data: मुंबईतील दुर्घटनांचा धक्कादायक आकडा! साडेसहा वर्षांत ७२० जणांचा मृत्यू, हजारो जखमी

​खैराणी रोडवरील अब्दू रशीद कंपाऊंडमधील तळमजला अधिक एक मजली गाळे व चाळींमध्ये मंगळवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास आग भडकली. सुरुवातीला काही दुकानांपुरती मर्यादित असलेली ही आग बघता-बघता सुमारे ६० ते ७० व्यावसायिक गाळे आणि घरांमध्ये पसरली. आगीची तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने सायंकाळी ६.३७ वाजता ‘लेव्हल-२’ आग जाहीर केली.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर तयार गार्मेंट, प्लॅस्टिक दाणे, भंगार, लाकडी फर्निचर, रिकामे ॲरोसॉल कंटेनर्स आणि एलपीजी सिलिंडरचा साठा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. तसेच रस्त्यावर उभी असलेली दोन दुचाकी वाहने आणि एक टेम्पोही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक पोलीस, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आणि महानगरपालिकेच्या स्थानिक विभाग कार्यालयाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आठ फायर इंजिन, सहा जंबो टँकर्स आणि इतर विशेष उपकरणांच्या मदतीने आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.

Sakinaka fire Mumbai
Bhatsa Dam Water Storage: भातसा तलावातील पाणीसाठा तफावतीबाबत ‘स्थायी’त गदारोळ! एका आठवड्यामध्ये २८.८४ टक्के पाणी वापर

​अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच स्थानिक नागरिक व पोलिसांनी जखमींना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेत जाहिद अबिदुल्ला कुरेशी (२०, ४० टक्के भाजलेले), तौफिक शादिलाल कुरेशी (२०, ८० टक्के भाजलेले), लालचंद रामलखन गौतम (४०, १० टक्के भाजलेले) आणि कमाल जलालुद्दीन शाह (४२, ४० टक्के भाजलेले) हे चौघे जखमी झाले असून त्यांच्यावर ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.

Sakinaka fire Mumbai
Bhatsa Dam Water Storage: भातसा तलावातील पाणीसाठा तफावतीबाबत ‘स्थायी’त गदारोळ! एका आठवड्यामध्ये २८.८४ टक्के पाणी वापर

​मध्यरात्री आग आटोक्यात

ऑपरेशनदरम्यान घटनास्थळावरून दोघांचे पूर्णपणे जळालेले मृतदेह हाती आले. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले असून मृतांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत.

मध्यरात्री १२.३० वाजता ही आग पूर्णपणे विझवण्यात
यश आले. सदर आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अग्निशमन दल आणि पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news