Sambhajinagar Gangapur MLA Prashant Bamb Legislative session Commissioner G. Srikanth
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या विविध विषयांवरून सोमवारी (दि.१४) गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्याविरोधात अनेक आरोप केले. तसेच चौकशीची मागणीही केली. यावरून मंगळवारी महापालिका वर्तुळात आयुक्तांना शहर अभियंता अविनाश देशमुख आणि एम. बी. काझी प्रेम अंगलट आल्याचीच चर्चा अधिकारी- कर्मचाऱ्यांमध्ये रंगल्याचे दिसून आले.
महापालिकेत सुमारे ३२ हून अधिक अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरही पुन्हा सेवेत मुदतवाढ देण्यात आली आहे. यात काही अधिकारी तर दोन ते तीन वर्षे असेच सहा-सहा महिन्यांच्या मुदतवाढीवर सेवा बजावत होते. याविरोधात आमदार प्रशांत बंब यांनी ओरड केली. तसेच या अधिकाऱ्यांना दिलेल्या अधिकारावरही ताशेरे ओढले.
त्यानंतरही प्रशासकांनी या अधिकाऱ्यांना सेवेत कायम ठेवले. परंतु याबाबत बातमी झळकताच प्रशासकांनी तडकाफडकी काही अधिकाऱ्यांना मुतदवाढ न देण्याचा असले तरी अजूनही काही अधिकाऱ्यांबाबत प्रशासकांना मोह आवरत नसल्याचेच चित्र दिसत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांना एक ते दीड वर्षापासून मुदतवाढ देत सेवेत कायम ठेवले. यात प्रामुख्याने शहर अभियंता अविनाश देशमुख, एम. बी. काजी यांचा समावेश आहे.
या प्रकरणावरून गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी सोमवारी विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रशासक जी. श्रीकांत यांच्या कार्यकाळातील कामांची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच प्रशासकांवर अनेक गंभीर आरोपही केले. त्यांच्या या आर-ताशेरे ोपानंतर मंगळवारी महापालिका वर्तुळातील विविध अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये दिवसभर चर्चा रंगल्याचे ऐकावसाच मिळाले. काही तर आयुक्तांना देशमुख, काजी यांचे प्रेम अंगलट आल्याचे बोलून दाखविले.