

16 people were duped of Rs 34 lakhs by luring them with Rohyo loans
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री रोजगार हमी योजनेमार्फत कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून चौघांनी १६ जणांना सुमारे ३४ लाख रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार २२ एप्रिल २०२४ ते १६ जुलै २०२५ या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घडला.
प्रियंका रवींद्र निकम, तिचा पती रवींद्र रतन निकम (दोघेही रा. सारा परिवर्तन, ई-सेक्टर), सहकारी विद्या दौलत गायकवाड, राणी दीपक सोनवणे आणि इतर सहकारी अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी संगीता दयाराम कांबळे (४५, रा. होनाजीनगर) यांच्या तक्रारीनुसार, जानेवारी २०२४ मध्ये त्या सावंगी येथे वैशाली पाटीलच्या ब्युटी पार्लरमध्ये मैत्रीण भारती संजय देवरेसोबत गेल्या. तिथे आरोपी प्रियंका निकमसोबत त्यांची ओळख तिने पती रवींद्र, सहकारी विद्या आणि राणी मिळून मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री रोजगार हमी योजनेचे कर्ज मंजूर करून देतो. या योजनेत गरिबांना शासनाकडून कर्ज मंजूर झालेले असते, परंतु परतफेड करण्याच्या भीतीने ते कर्ज नको म्हणून शासनाला लिहून देतात.
तुम्हाला कर्ज हवे असल्यास त्यांच्या नावाच्या फाईल तुमच्या नावे मजूर करून देऊ, असे आमिष दाखविले. विश्वास बसल्याने संगीता आणि भारती यांनी प्रियंकाच्या घरी जाऊन २५ लाख रुपयांच्या कर्ज फाईलसाठी २५ हजार रुपये दिले. त्यानंतर आणखी कर्ज घेण्यासाठी म्हणून आरोपी विद्या आणि राणीच्या फोनपेवर संगीता यांनी टप्प्याटप्प्याने १२ लाख ५५ हजार रुपये पाठवले. मात्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवल्याचे सांगून नंतर टाळाटाळ सुरू केली. इतर महिलांकडूनही या आर-झाली. ोपींनी मोठी रक्कम उकळली आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात एपीआय दिलीप चंदन यांनी गुन्हा नोंदविला. अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार करत आहेत.
कर्नाटक मुख्यमंत्री रोजगार हमी योजनेतून महाराष्ट्र मुख्यमंत्री रोजगार हमी योजनेत फाईल ट्रान्स्फर करून घयायची असल्यास मला तात्काळ १० लाख रुपये द्या. फाईल मंजूर होताच तुमचे सर्व कर्ज रक्कम भेटून जाईल, असे प्रियंकाने सांगितले. त्यामुळे संगीता यांनी दागिने गहाण ठेवून तिला १ लाख रुपये दिले. तिने एसबीआय बँकेचा शिक्का असलेली एक चिट्ठी दिली. त्यात २० जूनला खात्यावर पैसे जमा होतील, असे लिहिले होते. मात्र बँकेत गेल्यानंतर त्यांनी तो बोगस असल्याचे सांगितले.
भारती देवरे (८ लाख ८६ हजार), संदीप जगदाळे (२ लाख), अनिता देवळे (१ लाख ७९ हजार), शंकर पारधे, परमेश्वर पारधे, रामेश्व पारधे, राजश्री पारवे, विठ्ठल बारगळ्ळ किरण पारधे (प्रत्येकी १ लाख), पंडि जगदाळे, भाऊसाहेब दाँगे (प्रत्येक ५० हजार), संगीता पळसे (३ हजार), मयुरी काकडे, संगीता साळ (प्रत्येकी २५ हजार) अशी एकूण ३ लाख ५ हजारांची फसवणूक झाली.
लोकांचा विश्वास बसावा म्हणून आरोपींनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात महिलांना नेऊन तिथे पैसे घेतले असल्याचे शपथपत्र/हमीपत्र करून दिले. तसेच रकमेचा दानदेश देऊ, असेही सांगितले.
५ लाख रुपयांची कर्ज फाईल नावावर करून घ्यायची असल्यास १० हजार रुपये, २५ लाखांसाठी २० हजार, ५० लाखांसाठी ४८ हजार रुपये द्यावे लागतील. एकापेक्षा अधिक कर्ज फाईली मंजूर करून घेऊ शकता. नातेवाइकांच्या नावेसुध्दा कर्ज घेऊ शकता, असे सांगितले. तसेच कर्जाची परतफेड करण्याची आवश्यकता नाही, असे आमिप दाखविले. १०० ते २०० कर्ज फाईलही घेऊ शकता, असे सांगितले.