Sambhajinagar Crime News : क्षुल्लक वाद; मेहुण्याचा तीन साल्यांवर कोयत्याने हल्ला File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : क्षुल्लक वाद; मेहुण्याचा तीन साल्यांवर कोयत्याने हल्ला

एकाची तीन बोटे छाटली; जयभवानी नगरातील थरार

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar Crime News

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एका माथेफिरू मेहुण्याने आपल्या तीन साल्यांवर कोयत्याने सपासप वार करत जीवघेणा हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (दि.८) दुपारी १ वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी परिसरातील जयभवानी नगर येथे घडली. या भयंकर हल्ल्यात एका साल्याच्या हाताची तीन बोटे तुटून पडली, तर इतर दोन भाऊही गंभीर जखमी झाले.

याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपीला जालना येथून पाठलाग करत बेड्या ठोकल्या. गोविंद चंद्रकांत पवार (वय ५०, रा. जयभवानी नगर, गल्ली नं. १) असे आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनाल्याचे पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी सांगितले.

फिर्यादी प्रशांत श्रीहरी चाफाकानाडे (३३, रा. जयभवानी नगर) यांच्या तक्रारीनुसार, प्रशांत हे त्यांचे भाऊ अंगद आणि भारत यांच्यासह जयभवानी नगर येथे राहतात. त्यांच्या घरासमोरच त्यांची विवाहित बहीण आणि तिचे पती (आर-ोपी) गोविंद पवार राहतात. आठ दिवसांपूर्वी गोविंदने त्याच्या स्वतःच्या मुलाला मारहाण केली होती.

मुलाला का मारता? असा जाब साल्यांनी विचारला होता. त्याचाच राग आरोपी गोविंदच्या मनात खदखदत होता. ८ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास गोविंद याने मोठा साला भारत याला घराबाहेर बोलावून शिवीगाळ सुरू केली. भारतने फोन करून बोलावल्याने प्रशांत आणि अंगद हे दोघेही तिथे पोहोचले. यावेळी संतापलेल्या गोविंदने आज तुम्हा तिघांना जीवे ठार मारून तुमचा खातमा करतो, अशी धमकी देत घरातून थेट कोयता आणला. त्याने प्रशांतच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला.

प्रशांतने तो वार चुकवला, मात्र त्यानंतर गोविंदने पुन्हा केलेल्या हल्ल्यात प्रशांतच्या हाताची मधली तीन बोटे तुटून पडली. रक्ताच्या थार- ोळ्यात पडलेल्या भावाला वाचवण्यासाठी अंगद आणि भारत मध्ये आले असता, गोविंदने त्यांच्यावरही कोयत्याने वार करून जखमी केले.

आरडाओरडा झाल्याने नागरिक मदतीला धावले. धमकी देत आरोपी गोविंद तेथून पसार झाला. त्याला जालना येथून मुकुंदवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात आरोपी गोविंद पवारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT