Sambhajinagar Crime : सराईत चोरट्याकडून चोरीच्या ७ दुचाकी जप्त  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime : सराईत चोरट्याकडून चोरीच्या ७ दुचाकी जप्त

रेकॉर्डवरील एका सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळत जवाहरनगर पोलिसांनी ७ दुचाकीसह २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar 7 stolen bikes seized from thief

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रेकॉर्डवरील एका सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळत जवाहरनगर पोलिसांनी ७ दुचाकीसह २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई ७ ऑगस्ट रोजी करण्यात आली. राहुल ऊर्फ पप्पू बबन राठोड (२२, रा. नाईकनगर, बीड बायपास) असे वाहन चोरट्याचे नाव आहे.

याच्याविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचे तब्बल १० गुन्हे दाखल आहेत. तर जवाहरनगर, मुकुंदवाडी, उस्मानपुरा आणि गेवराई पोलिस ठाण्यात एकूण सात गुन्हे दाखल दाखल आहेत.

किरण जगन मुंढे (२४, रा. चिकलठाणा) यांची ५ ऑगस्ट रोजी सिम्मा हॉस्पिटल येथून दुचाकी (एमएच-१२-जीएन-१०२५) चोरट्यांनी पळवली होती. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस तपास करत असताना त्यांना ७ ऑगस्ट रोजी एक दुचाकी चोर खडी रोड, बीड बायपास येथे दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचला. दरम्यान पोलिसांची चाहूल लागताच वाहन चोरटा पळून जात असताना त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले.

चोरीच्या सात दुचाकी जप्त

पोलिसांच्या ताब्यात येताच राहुल ऊर्फ पप्पूने वाहने चोरट्याची कबुली दिली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली. कोठडीदरम्यान शहरातील विविध ठिकाणांहून चोरलेल्या ७ दुचाकी काढून दिल्या. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रेवती थोरवडे, सोन पवार, जावेद पठाण, संदीप क्षीरसागर, मारोती गोरे, मंगेश घुगे आदींनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT