Sambhaji Nagar Crime News : मैत्रिणीसोबत बोलल्याने मित्राचे अपहरण File photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Crime News : मैत्रिणीसोबत बोलल्याने मित्राचे अपहरण

रात्रभर डांबून ठेवत लोखंडी रॉडने केली बेदम मारहाण, चार जणांविरुध्द गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा

तू माझ्या मैत्रिणीसोबत का बोलतोस, माझ्याशी गद्दारी करत आहेस, असा आरोप लावत दोन मित्र व त्यांच्या सहकाऱ्यांनी एका १७ वर्षीय विद्यार्थ्यांचे उत्सव चौकातून थार गाडीत अपहरण केले. त्याला रात्रभर कोंडून ठेवत बेल्ट आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी चार अपहरणकर्त्यांविरुद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक १७ वर्षांचा युवक उस्मानपुरा भागातील एका कोचिंग सेंटरमध्ये नीटची तयारी करत आहे. ७ जून रोजी रात्री ८.३० वाजेदरम्यान हा युवक उत्सव चौकातून जेवण करण्यासाठी जात असताना त्याच्या ओळखीचे अनिकेत कणसे आणि अजय या दोघांनी त्याला बाजूलाच उभ्या असलेल्या काळ्या रंगाच्या थार गाडीत बळजबरीने बसवले. या गाडीत या दोघांव्यतिरिक्त आणखी दोन तरुण होते.

त्या युवकाला घेऊन ही थार गाडी प्रतापन-गरच्या मैदानात गेली. तेथे अनिकेतने त्या युवकला तू माझ्या प्रेयसीसोबत का बोलतो, असे म्हणत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

रूमवर सोडतानाही दिली धमकी

रात्रभर मारहाण केल्यानंतर, सकाळी अप-हरणकर्त्यांनी त्या युवकाला रविवारी सकाळी रूमवर सोडले. रूमवर सोडतानाही त्याच्या मित्रांनी पुन्हा तिच्याशी बोललास तर तुला जिवे मारेन, अशीही धमकी दिली.

या प्रकरणात पीडित युवकाच्या तक्रारीवरून अनिकेत कणसे, अजय, महेश व अनोळखी एक व्यक्तीच्या विरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साई टेकडी परिसरात रात्रभर गाडीतच कोंडून ठेवले

अपहरणकर्त्या युवकांनी त्यांची गाडी साई टेकडी, सातारा परिसराकडे नेली. या ठिकाणी चौघांनी कमरेच्या बेल्ट, लोखंडी रॉडने त्याला रात्रभर मारहाण केली. ती पूर्ण रात्र त्याला गाडीतच कोंडून ठेवले. सकाळ होताच त्याला ८ जून रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान जखमी असस्थेत रूमजवळ सोडून दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT