Thailand Cosmetics : मेड इन थायलंडची बनावट सौंदर्य प्रसाधने विक्रीचा पर्दाफाश file photo
छत्रपती संभाजीनगर

Thailand Fake Cosmetics : मेड इन थायलंडची बनावट सौंदर्य प्रसाधने विक्रीचा पर्दाफाश

कॉस्मेटिकवर एफडीएचा छापा; मालकीणसह पुरवठादारावर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Sale of fake cosmetics made in Thailand exposed

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात कोणत्याही अधिकृत परवान्याविना आणि आरोग्याला घातक असलेल्या मेड इन थायलंड छाप बनावट सौंदर्य प्रसाधनांची (कॉस्मेटिक्स) सर्रास विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गारखेडा परिसरातील काबरा नगर येथील अश्मिरा गाझी कॉस्मेटिक क्रीम या दुकानावर गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) छापा मारून तब्बल ३ लाख ५५ हजार ९१ रुपयांचा बनावट कॉस्मेटिक्सचा साठा जप्त केला आहे.

आयेशा परवीन मोहम्मद सर्वर, मालेगाव येथील पुरवठादार (गाझी क्रीम), इतर अनोळखी आणि संबंधित संस्था अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी एफडीएचे औषध निरीक्षक मनोज पैठणे यांच्या तक्रारीनुसार, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अर्जुन कदम यांना गारखेडा परिसरातील काबरा नगर येथील एका दुकानात उत्पादकाचे नाव, परवाना क्रमांक आणि आयात परवाना नसलेल्या सौंदर्य प्रसाधनांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.

या माहितीवरून १३ जुलै रोजी एफडीएचे सहायक आयुक्त व्ही. व्ही. नांगरे आणि गुन्हे शाखेच्या पथकाने अब्दुल किराणाजवळ असलेल्या अश्मिरा गाझी कॉस्मेटिक क्रीम या दुकानावर छापा टाकला. यावेळी दुकानात मेड इन थायलंड असा उल्लेख असलेली, मात्र अधिकृत आयात परवाना नसलेली अनेक सौंदर्य प्रसाधने आढळून आली. दुकानाच्या प्रोप्रा. आयेशा परवीन मोहम्मद सर्वर यांच्याकडे या साठ्याबाबत कोणतीही पक्की बिले किंवा अधिकृत आयात प्रमाणपत्र नव्हते. त्यामुळे ठाण्यात दुकानाची मालकीण आयेशा सर्वर आणि मालेगाव येथील पुरवठादार गाझी क्रीम मालेगाव (नवीन आझाद नगर पोलिस चौकी, मालेगाव) गुन्हा दाखल करण्यात आला.

Sale of fake cosmetics made in Thailand exposed

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात कोणत्याही अधिकृत परवान्याविना आणि आरोग्याला घातक असलेल्या मेड इन थायलंड छाप बनावट सौंदर्य प्रसाधनांची (कॉस्मेटिक्स) सर्रास विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गारखेडा परिसरातील काबरा नगर येथील अश्मिरा गाझी कॉस्मेटिक क्रीम या दुकानावर गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) छापा मारून तब्बल ३ लाख ५५ हजार ९१ रुपयांचा बनावट कॉस्मेटिक्सचा साठा जप्त केला आहे.

मालेगाव कनेक्शन आणि आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय

एफडीएने दुकानातून ४ नमुने विश्लेषणासाठी मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठवले असून, उर्वरित ३ लाख ५५ हजार ९१ रुपयांचा साठा जप्त केला आहे. दुकानाच्या मालकीण आयेशा परवीन यांनी २२ जुलै रोजी दिलेल्या लेखी स्पष्टीकरणात हा माल मालेगाव येथील 'गाझी क्रीम मालेगाव' या पेढीमधून कोणत्याही पक्क्या बिलाविना (कच्च्या पावतीवर) खरेदी केल्याची कबुली दिली आहे. या बनावट सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती कुठे झाली, त्यासाठी लागणारा कच्चा माल कुठून आला, यामागे आंतरराज्यीय किंवा आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय आहे का? यादृष्टीने सखोल तपास केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT