Railway File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sachkhand Express delay today: नांदेड येथून अमृतसरकडे जाणारी सचखंड एक्स्प्रेस आज आठ तास उशिरा धावणार

नांदेड येथून अमृतसरकडे जाणारी सचखंड एक्स्प्रेस १ नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज आठ तास उशिराने धावणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

Sachkhand Express delay today

छत्रपती संभाजीनगर: नांदेड येथून अमृतसरकडे जाणारी सचखंड एक्स्प्रेस १ नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज आठ तास उशिराने धावणार आहे. सचखंड एक्स्प्रेस नांदेड रेल्वे स्थानकावरून सकाळी ९:३० ऐवजी सायंकाळी ५:३० वाजता सुटेल. नियोजित वेळेपेक्षा आठ तास उशिराने गाडी सुटणार असल्याने प्रवाशांनी स्थानकावर जाण्यापूर्वी सुधारित वेळेची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

देशातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर गर्दी नियंत्रणाची तयारी

सणासुदीच्या काळातील प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून देशातील प्रमुख स्थानकांवर स्वतंत्र 'यात्री सुविधा केंद्रे' उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांना प्रतीक्षा करण्यासाठी आणि तिकीट काढण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणे हा यामागील उद्देश आहे.

१५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत १८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पाच स्थानकांवर कायमस्वरूपी प्रतीक्षा क्षेत्रे उभारण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आणखी ५५ स्थानकांवर अशी सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे. रेल्वे स्थानकांवरील गर्दीचे नियोजन आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

आज मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून आज रविवार, १ नोव्हेंबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावरील सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT