Railway Wheel Damage | रेल्वेचे चाक कधी खराब होते?

Railway Wheel Damage |
Railway Wheel Damage | रेल्वेचे चाक कधी खराब होते?
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : भारतात रोज कोट्यवधी लोक ट्रेनने प्रवास करतात. रेल्वेतील प्रवास हा सुरक्षित मानला जातो. याच सुरक्षित रेल्वे प्रवासात रेल्वेची लोखंडी चाके महत्त्वाची भूमिका बजावतात. कित्येक वर्षे फिरत असूनही कोणताही अपघात न होऊ देता रेल्वेला धावते ठेवण्याचे काम करतात. परंतु, रेल्वेची चाके नेमकी कधी झिजतात, ती कधी बदलावी लागतात, याची अनेकांना कल्पना नसेल. सोबतच, रेल्वेच्या दोन चाकांची किंमत किती हेही अनेकांना माहिती नसेल. याबाबतच सविस्तर जाणून घेऊ या...

साधारणपणे रेल्वेच्या चाकांचे आयुष्य ४ ते ६ वर्षे असू शकते. या काळात चाके अंदाजे १२ ते १५ लाख किलोमीटरचा प्रवास करू शकतात. मात्र, चाकांचे आयुष्य ट्रेनचा वेग, वजन, रेल्वेमार्गाची स्थिती आणि वाहतूक यावर अवलंबून असते. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन भारतीय रेल्वेकडून चाकांची नियमित तपासणी आणि देखभाल केली जाते. या प्रक्रियेत चाकांचा आकार, जाडी आणि झीज तपासली जाते. चाकांची किरकोळ झीज झाल्यास ती लगेच बदलण्याऐवजी री-प्रोफाईलिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो.

ट्रेनच्या एका चाकाची किंमत ७० ते ८० हजार रुपये गृहीत असते, असे सांगितले जाते. ही किंमत गृहीत धरल्यास दोन चाकांसाठी सुमारे १.४० ते १.६० लाख रुपये खर्च येऊ शकतो. मात्र, चाकांची जोडी आणि संपूर्ण व्हीलसेट यामध्ये फरक असतो. व्हीलसेटमध्ये दोन चाकांसोबत त्यांना जोडणारा अ‍ॅक्सलही असतो. एका चाकाची किंमत ७० हजार रुपये धरल्यास, आठ चाकांसाठी सुमारे ६.६० लाख रुपये खर्च येतो. १८ ते २२ डब्यांच्या एक्स्प्रेस ट्रेनमधील चाकांचा एकत्रित खर्च आणखी वाढतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.