Sambhajinagar Crime News : रिक्षा चालकाने पोलिसांच्या अंगावर घातली रिक्षा File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : रिक्षा चालकाने पोलिसांच्या अंगावर घातली रिक्षा

२० फूट फरपटत नेले : वाहतूक पोलिस गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

Rickshaw driver rams rickshaw into police

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गुन्हेगारी वृत्तीच्या एका रिक्षाचालकाने थेट वाहतूक पोलिसाच्या अंगावर रिक्षा घातली. पोलिसाला त्याने सुमारे २० फुटांपर्यंत फरपटत नेले. यात वाहतूक पोलिस अंमलदार तुकाराम टाकसाळे हे गंभीर जखमी झाले.

त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बाबा चौकात रविवारी (दि.२३) दुपारी घडली. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युसूफ मोहंमद अली अन्सारी (२७, रा. दौलताबाद) असे रिक्षाचालकाचे नाव असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सचिन मिरधे यांनी दिली.

रविवारी बाबा चौकात छावणी वाहतूक शाखेचे पोलिस कारवाई करीत होते. बाबा चौकाकडून पंचवटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभे असलेले अंमलदार तुकाराम टाकसाळे यांना एक रिक्षाचालक (एमएच-२० ईके ४६३२) विनागणवेश असल्याचे निदर्शनास आले.

त्यांनी त्याला थांबण्याचा इशारा केला, मात्र रिक्षाचालक युसूफ थांबला तर नाहीच उलट भरधाव वेगात टाकसाळे यांच्या अंगावर रिक्षा घातली. त्यामुळे ते रस्त्यावरच कोसळले. यात टाकसाळे रिक्षाच्या खालच्या बाजूला अडकल्याने रिक्षाचालकाने त्यांना सुमारे २० फुटांपर्यंत फरपटत नेले. यात टाकसाळे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT