Crime News : प्रेमासाठी स्वतःच्या घरातच मुलीने केली दोन वेळा चोरी

आईच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Sambhajinagar Crime News
Crime News : प्रेमासाठी स्वतःच्या घरातच मुलीने केली दोन वेळा चोरी File Photo
Published on
Updated on

Girl steals twice in her own house for love

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कॉलनीत राहणाऱ्या एका मुलाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या मुलीने आपल्याच घरात दोन वेळा चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक वेळेस रोख रक्कम, तर दुसऱ्या वेळेस सोन्याचे दागिने पळवल्याचे समोर आले. सततच्या गैरवर्तनाला कंटाळलेल्या आईने मुलीविरुद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Sambhajinagar Crime News
Ajanta Caves : अजिंठा लेणीला ३० हून अधिक देशांच्या राजदूतांच्या प्रतिनिधी मंडळाची भेट

ही घटना हसूल परिसरातील होणाजीनगर येथे घडली असून, या १९ वर्षीय मुलीचे कॉलनीतील एका मुलासोबत प्रेमसंबंध जुळले. या प्रकरणाची माहिती दोन्ही कुटुंबांना मिळाल्यावर त्यांनी त्यांच्या संबंधांना विरोध केला. त्यामुळे प्रेमीयुगुलाने पळून जाण्याचा निर्णय घेतला.

पहिली चोरी : ११ लाख रुपयांची

पळून जाण्यासाठी पैशाची गरज असल्याने मुलीने थेट घरातील ११ लाख रुपयांची रोकड सोबत घेऊन प्रियकरासोबत पळ काढला. दरम्यान, दोन्ही कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेणे सुरू होते. इकडे या युगुलांकडील पैसेही संपले मग त्या दोघांनी परत घर जवळ केले. पहिली चूक असल्याने पालकांनी त्यांना माफ केले. मुलीनेही यापुढे असे वागणार नाही, असे वचन दिले होते.

Sambhajinagar Crime News
Shendra MIDC : शेंद्रा एमआयडीसीतील कामांची तपासणीही निकृष्ट

दुसऱ्यांदा सोने पळवले

काही महिने व्यवस्थित राहिल्यानंतर, विरह सहन न झाल्याने तिने प्रियकराशी पुन्हा बोलणे सुरू केले आणि पुन्हा पळून जाण्याची योजना बनवली. घरातून यावेळी मुलीने तोळे २ सोन्याचे दागिने चोरले आणि पळ काढला. मुलीने पुन्हा चोरी करून प्रियकरासोबत पळ काढल्याचे लक्षात येताच तिच्या आईने थेट उस्मानपुरा पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. या तक्ररीवरून मुलीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news