क्रिप्टो करन्सी, शेअर मार्केटच्या आमिषाने निवृत्त व्यवस्थापकाला ५० लाखांचा गंडा File Photo
छत्रपती संभाजीनगर

क्रिप्टो करन्सी, शेअर मार्केटच्या आमिषाने निवृत्त व्यवस्थापकाला ५० लाखांचा गंडा

क्रिप्टो करन्सी आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका निवृत्त व्यवस्थापकासह त्यांच्या नतेवाइकांना तब्बल ४९ लाख ८० हजार रुपयांचा गंडा घातला.

पुढारी वृत्तसेवा

Retired Manager Swindled Out of ₹50 Lakhs Through Cryptocurrency and Stock Market Scams

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : क्रिप्टो करन्सी आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका निवृत्त व्यवस्थापकासह त्यांच्या नतेवाइकांना तब्बल ४९ लाख ८० हजार रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार जून २०२१ ते २२ जुलै २०२५ या काळात हेडगेवार हॉस्पिटलसमोर, चव्हाण यांच्या हॉटेलवर घडला. या प्रकरणी शनिवारी (दि.२८) जवाहरनगर पोलिस ठाण्यात आरोपी विजय भानुदास शिंदे (रा. पुंडलिकनगर) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी देविदास मोतीराम राठोड (६२, रा. बी-न्यू शांतीनिकेतन कॉलनी, जवाहर कॉलनी रोड) हे एका दैनिकातून व्यवस्थापक पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, मे २०२१ मध्ये राठोड यांची ओळख हॉटेल व्यावसायिक चव्हाण यांच्या माध्यमातून आरोपी विजय शिंदे याच्याशी झाली होती. शिंदे याने आपण एन इंटरप्रायजेस प्रा. लि. या नावाने फर्म चालवत असून, क्रिप्टो करन्सी, सुपरवन, डेझी आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठा परतावा मिळवून देतो, असे आमिष राठोड यांना दाखवले. सुरुवातीला ४ जून २०२१ रोजी राठोड यांनी १० हजार रुपये गुंतवले, ज्याचा परतावा म्हणून आरोपीने २० दिवसांत २५ हजार रुपये दिले. यामुळे राठोड यांचा आरोपीवर विश्वास बसला.

नातेवाइकांच्या पैशावरही डल्ला

सुरुवातीला परतावा दिल्यानंतर आरोपीने नवनवीन स्कीम सांगून राठोड यांच्याकडून वेळो-वेळी लाखो रुपये उकळले. 4MB 3320 अडीच लाखाच्या गुंतवणुकीवर ९० दिवसांत १० लाखांचे आमिष, तर कधी ११ लाख भरल्यास आठ महिन्यांत सव्वा कोटी रुपये मिळतील असे खोटे आमिष दाखवले गेले. अधिक नफ्याच्या आशेने राठोड यांनी टप्याटप्याने स्वतः चे १३ लाख ७० हजार रुपये, पत्नी विजया यांचे ६ लाख ५० हजार, भावजय यशोदा यांचे २ लाख ५० हजार, बहीण मीराबाई यांचे १ लाख ६० हजार, साला अनिल चव्हाण यांचे ८ लाख ५० हजार, संतोष चव्हाण यांचे ८ लाख २५ हजार आणि पुतण्या विजयचे ८ लाख ७५ हजार असे एकूण ४९ लाख ८० हजार रुपये आरोपीला गुंतवण्यासाठी दिले.

३० कोटी जमा झाल्याची थाप

मुदतीत पैसे न मिळाल्याने राठोड यांनी शिंदेकडे तगादा लावला. त्याने वेळ मारून नेण्यासाठी WOL 10M 449109 भारतीय रिजर्व त्याच्या पत्नीच्या खात्यातून ४१ आणि ५० हजार असे दोनवेळा दिले. त्यानंतर माझ्याकडे ३० कोटी जमा झाले आहे. तुमचे कॅन्सल चेक पाठवा, असे शिंदेने सांगितले. राठोड यांनी चेकचे फोटो टाकले. मात्र त्याने पुन्हा टाळाटाळ केली. शिंदेची पत्नी आणि आईने २०२५ पर्यंत पैसे दिले नाही तर केस करा, असे सांगितले होते. मात्र पैसे काही राठोड याना मिळाले नाही. अखेर शनिवारी (दि. २८) राठोड यांच्या तक्रारीवरून शिंदेविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक मारोती खिल्लारे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT