Retired judge defrauded; builder remanded to police custody
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा निवृत्त न्यायधीशांनी डेव्हलप करण्यासाठी दिलेल्या भूखंडावर बँकेकडून परस्पर कर्ज घेत निवृत्त न्यायधीशाचांची ८५ लाखांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर मधुसूदन अत्तारवार याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
निवृत्त न्यायाधीश त्र्यंबकराव जाधव यांचा बेगमपुरा येथील तळेश्वर हौसिंग सोसायटीत भूखंड आहे. हा भूखंड त्यांनी मधुसूदन दिलीप अत्तरवार या बिल्डरला डेव्हलप करण्यासाठी दिला. यासाठी झालेल्या करारानुसार बिल्डरने भूखंड तारण ठेवणे किंवा त्यावर कर्ज न घेन्याचे नमूद करण्यात आलेले होते. दरम्यान बिल्डर अत्तरवर यांनी भूखंडावर ३५ टक्के बांधकाम केल्यावर डेव्हलपचे काम बंद पडले.
त्र्यंबकराव जाधव यांनी बिल्डरला भेटण्यासाठी प्रयत्न केले. मात्र अत्तरवार त्यांना टाळत होता. दरम्यान त्र्यबकराव जाधव यांना एके दिवशी भूखंडावर झालेल्या बांधकामावर यवतमाळ अर्बन को. आप. बँकेची कर्ज घेतल्याची पाटी निदर्शनास आली. त्यानुसार त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता बिल्डर अत्तरवार याने जाधव यांचा तो भूखंड तारण ठेऊन कर्ज घेतल्याचे त्यांना सांगण्यात आहे.
बिल्डरने परस्पर कर्ज ही घेतले आणि भूखंडवरील बांधकामही अर्धवट सोडून गेल्याने आपली फसणूक झाल्याले त्र्यंबकराव जाधव यांचा लक्षात आले. त्यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिल्ली त्यानुसार पोलिसांना बिल्डर अत्तरवार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र अत्तारवार फरार झाला होता. अखेर पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली आणि २२ जून रोजी न्यायालयासमोर हजर केले.
न्यायदंडाधिकारी एच. व्ही. देशमुख यांनी सरकारी वकील शेख यांचा युक्तिवाद आणि पोलिस उपनिरिक्षक मारोती मद्देवाड यांनी मांडलेले मुद्दे ग्राह्य धरले आणि या प्रकरणी आरोपी बिल्डर अत्तरवार याला २६ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.