Sambhajinagar News : भटके-विमुक्त जाती-जमातींसाठी तिसरी सूची तयार करा  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : भटके-विमुक्त जाती-जमातींसाठी तिसरी सूची तयार करा

राजपूत परदेशी समाजाच्या दसरा मेळाव्यात मागणी

पुढारी वृत्तसेवा

Rajput Pardeshi Samaj Dassara Melava

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा: राजपूत परदेशी समाजाचा ऐतिहासिक दसरा मेळावा गिरजा माता गड, महेशमाळ (ता. खुलताबाद) येथे प्रचंड उत्साहात पार पडला. भटके-विमुक्त जाती-जमातींची तिसरी सूची तयार करून घटनात्मक आरक्षण लागू करावे, यांसह विविध ठराव या मेळाव्यात मंजूर करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात गिरीजा माता, महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून, तसेच पारंपरिक शस्त्रपूजन करून करण्यात आली. यावेळी परिसर जय महार-ाणा, राजपूत परदेशी समाज एकजूट जिंदाबाद अशा घोषणांनी दुमदुमला. व्यासपीठावर माजी आमदार उदयसिंग राजपूत, कवरसिंग बैनाडे, चैतन्यगिरी महाराज, तोताराम बहुरे, सुभाष महेर, प्रा. डॉ. भगवानसिंग डोभाल, पदमसिंग राजपूत, महादुसिंह डोभाल, डॉ. करतार बापू परदेशी, भरतसिंग घुनावत, रामसिंग बहुरे, विजयसिंग झाला, राजेशसिंह सूर्यवंशी, अॅड. नरेंद्र शेवगण, डॉ. गीता शेवगण, फुलसिंग राजपूत, प्रेमसिंग राजपूत, काळूराम राजपूत, सुरेश जोनवाल, महाजन चुंगडे, संजयसिंग गोलवाल, सचिन कवाल, युवराज बहुरे, परशुराम बहुरे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष महेर यांनी केले. तर आभार अमरसिंग परदेशी यांनी मानले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह जालना, बीड, बुलढाणा, जळगाव, मुंबई आदी जिल्ह्यांमधून हजारो समाज बांधवांनी मेळाव्याला हजेरी लावून एकजुटीचा संदेश दिला.

मेळाव्यात पारित झालेले ठराव

> भटके-विमुक्त जाती-जमातींची तिसरी सूची तयार करून घटनात्मक आरक्षण लागू करावे.

▶ अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देऊन पीककर्ज माफ करावे.

▶ वीर शिरोमणी आर्थिक विकास महामंडळास ५०० कोटींचा निधी मंजूर करावा..

▶ महाराणा प्रताप यांची जयंती ९ मे रोजी राज्यभर साजरी करून सार्वजनिक सुट्टी घोषित करावी.

▶ प्रत्येक जिल्ह्यात शासनमान्य अनुदानित विद्यार्थी वसतिगृह स्थापन करावे.

▶ महाराणा प्रताप यांच्या शौर्यपूर्ण इतिहासाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करावा.

▶ राजपूत भामटा, परदेशी भामटा समाजाच्या वाडी, तांड्यांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात.

▶ जातप्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करावी.

▶ गिरजा माता गडला पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

▶ वीर शिरोमणी आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष व सदस्यांची तत्काळ नेमणूक करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT