Railways housefull on various routes on the occasion of Diwali
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सध्याच सर्वच मार्गांवर प्रवाशांची गर्दी वाढल्याने रेल्वे हाऊस फुल्ल झाल्या आहेत. अनेकांनी एक महिन्यापूर्वी अॅडव्हान्स बुकिंग केली आहे. तरीही त्यांचे तिकीट अद्याप कन्फर्म झाले नाही. त्यामुळे प्रवासी पर्यायी मार्गाने घर जवळ करण्याच्या तयारीत आहेत.
त्यात सर्वत्र तयारी सुरू झाली आहे. अनेकांनी दिवाळीसाठी बाहेरगावी जाण्यासाठी नियोजन केले आहे. त्यात काहींनी दिवाळीच्या सुट्या घालविण्यासाठीही नियोजन केले आहे. त्यामुळे रेल्वेला अॅडव्हान्समध्ये बुकिंग करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे यंदाही दिवाळीनिमित्त रेल्वे फुल्ल झाल्या आहेत.
अनेकांनी महिनाभर अगोदरच बुकिंग केली, तर काही जण ऐन दिवाळीच्या तोंडावर अॅडव्हान्स बुकिंग करत आहेत. काहींना बुकिंग करूनही वेटिंगवर राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रवाशांची धाकधूक वाढली असून, इतर पर्याय निवडण्याची घाई करताना दिसून येत आहेत.
मुंबईकडे मार्ग फुल्ल
मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशी संख्या नेमीप्रमाणेच जास्त आहे. तपोवन एक-सप्रेसला २३ ऑक्टोबर, नंदीग्राम एक-सप्रेस, देवगिरी, राज्यराणी एक्सप्रेसला मोठ्या प्रमाणात वेटींग आहे.
दिवाळीनिमित काही आपापल्या गावी जात आहेत. तर काही जण पर्यटनांसाठी घराबाहेर पडणार आहेत. त्यामुळे रेल्वेला गर्दी वाढली आहे. धार्मिक स्थळांना जाणाऱ्या रेल्वेही हाऊसफुल झाल्या आहेत. त्यात काहीं रेल्वेला वेटिंग देखील आहे. त्यात साईनगर - शिर्डी एक्सप्रेसला १० नोव्हेंबरपर्यत वेटिंग आहे. नगरसोल ते तिरुपती-१० नोव्हेंबर पर्यंत तसेच तसेच जयपूर कडे जाणाऱ्या रेल्वे देखील फुल्ल झाल्या आहेत. सर्वच मार्गावर गर्दी राहणार आहे.