Vaijapur Politics | 'मग आम्ही जीव कुठे ठेवायचा?': ज्याचा आमदार, त्याचा नगराध्यक्ष : एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आ. बोरनारे यांचा दावा

MLA Ramesh Bornare | ज्याने माझ्या विरोधात निवडणूक लढवली त्याला नगराध्यक्षपदाची स्वप्न पडू लागली आहेत
Shiv sena Shinde group leaders meet
आमदार रमेश बोरनारे(Pudhari Photo)
Published on
Updated on

Vaijapur Shiv sena Shinde group leaders meet

नितीन थोरात

वैजापूर: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज (दि.१०) छत्रपती संभाजीनगर येथे शिंदे गटाच्या गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी थेट आणि ठाम भूमिका मांडत मोठी घोषणा केली “ज्याचा आमदार, त्याचा नगराध्यक्ष!”

या घोषणेनंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. बोरनारे म्हणाले, “ज्यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवली, तोच आज भाजपमध्ये गेला आहे, आणि आता तोच नगराध्यक्षपदाचे स्वप्न पाहत असेल, तर मग आम्ही जीव कुठे ठेवायचा?” त्यांनी पुढे स्पष्ट केले, “आमचंही मन आहे. त्यामुळे ‘ज्याचा आमदार, त्याचा नगराध्यक्ष’ हा फॉर्म्युला राबवावा,” अशी थेट विनंती त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर केली. राजकीय वर्तुळात बोरनारे यांच्या या विधानाने चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे डॉ. दिनेश परदेशी यांना डिवचल्याचं बोललं जात आहे

Shiv sena Shinde group leaders meet
Chhatrapati Sambhajinagar Theft News | भरदिवसा लुटले! छत्रपती संभाजीनगरमध्ये दसऱ्याच्या खरेदीसाठी आलेल्या व्यावसायिकाचे मोपेडची डिकी तोडून 2.85 लाख पळवले

“सर्वाधिक नगरसेवक शिवसेनेचे असताना नगराध्यक्ष आपला झाला नाही, त्यामुळे राज्यात कुठलाही फॉर्मुला राबवा पण वैजापूरला मात्र आपलाच उमेदवार अशी ठाम भूमिका बोरनारे यांनी या मेळाव्यात मांडली.

परदेशींवर अप्रत्यक्ष निशाणा

बोरनारे यांच्या विधानाने स्थानिक राजकारणात नव्या चर्चा रंगल्या आहेत. त्यांनी नाव न घेता डॉ. दिनेश परदेशी यांना अप्रत्यक्षपणे डिवचल्याचं मानलं जात आहे. परदेशी यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत बोरनारे यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली होती, आणि सध्या ते भाजपमध्ये सक्रिय आहेत. त्यामुळे बोरनारे यांच्या विधानाने “बोरनारे विरुद्ध परदेशी” असा राजकीय संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.

स्थानिक पातळीवर नवा रंग..

बोरनारे यांच्या भाषणानंतर वैजापूरच्या राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे. शिंदे गटातील पदाधिकारी आता “आमदाराचे नेतृत्व, आमचा नगराध्यक्ष” या घोषणेवर ठाम असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, भाजपमधील काही कार्यकर्त्यांनीही या विधानावर प्रतिक्रिया देताना “राजकारणात सर्वांना संधी असते” असा प्रतिसाद दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news