Railway administration hammers down on building worth crores of rupees
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रेल्वेस्थानकाची १४ वर्षांपूर्वीच बांधलेल्या इमारतीवर रेल्वे प्रशासनाने नुकताच हातोडा मारला आहे. यामुळे तब्बल ९८ लाख रुपये खर्चुन बांधलेली इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. नव्या अत्याधुनिक इमारतीसाठी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अत्याधुनिक इमारत बनवण्याचे नियोजन असताना येथे नवीन इमारत का उभारण्यात आली, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी नवीन इमारत उभारण्यासाठी २००९ मध्ये निविदा काढण्यात आली. येथील इमारतीच्या सुसज्जतेसाठी रेल्वे विभागाच्या वतीने तीन टप्प्यात निधी देण्यात येणार होता. पहिल्या टप्प्यात सुमारे ९८ लाखांचा निधी प्राप्त होताच इमारतीचा समोरील भाग व काही कार्यालयाने २०११ मध्ये उभारण्यात आली.
दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील निधी मिळण्याआधीच केवळ १४ वर्षात ही इमारत रेल्वेस्थानकाच्या नवीन इमारतीवर हातोडा मारण्यात आला. या जागेवर २२५ कोटी रुपये खर्चुन शॉपिंग मॉलसह लहान मुलांच्या खेळण्यासाठी तसेच प्रवाशांना सर्व सुविधांनी सज्ज असे विमानतळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानक उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
९८ लाखांच्या खर्चावर पाणी
१४ वर्षापूर्वीच उभारलेल्या इमारतीचा हाथोडा मारल्यान अनेकांनी नाराजी व्यक्त केली. या बाबत मात्र रेल्-वेच्या अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. दरम्यान या नव्या इमारतीचे प्लानिंग होते तर येथे ९८ लाख रुपये खर्च करून इमारत का उभारण्यात आली असाही प्रश्न प्रवाशांसह नागरिकांनी उपस्थित केला आहे. रेल्वे विभागाच्या या कृतीबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.