गॅस सिलिंडरसाठी एजन्सीबाहेर रांगा कायम file photo
छत्रपती संभाजीनगर

गॅस सिलिंडरसाठी एजन्सीबाहेर रांगा कायम

शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा अजूनही कायम आहे. बुकिंग केल्यानंतरही ग्राहकांना १० ते १४ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे.

पुढारी वृत्तसेवा

Queues continue outside agencies for gas cylinders

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा अजूनही कायम आहे. बुकिंग केल्यानंतरही ग्राहकांना १० ते १४ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. ज्यांच्याकडे केवळ एकच सिलिंडर आहे, अशा ग्राहकांना अधिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिणामी, एजन्सींसमोर ग्राहकांच्या रांगा दिसून येत आहेत.

आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशातील एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मागील पंधरा दिवसांपासून शहरात घरगुती गॅस सिलिंडर वेळेत मिळणे कठीण झाले आहे. जिल्ह्यात बीपीसीएल, एचपीसीएल व आयओसी या एलपीजी गॅस कंपनीच्या मिळून गॅस सिलिंडरच्या एकूण ७७ एजन्सी आहेत.

त्यापैकी २४ एजन्सी शहर परिसरात आहेत. बीपीसीएलद्वारे दरर ोज सरासरी ७ हजार ९३८ सिलिंडरची (घरगुती) विक्री होते. यासह एचपीस ीएल कंपनीकडून ६ हजार ९३८, तर आयओसी कंपनीकडून ५ हजार ६५४ असे मिळून जिल्ह्यात दररोज २० हजार ५३० घरगुती गॅस सिलिंडरची विक्री होते.

युद्ध सुरू होण्यापूर्वी गॅस वितरक एजन्सीकडे दररोज सरासरी ५५० ते ९०० घरगुती गॅससाठी बुकिंग होत असे आणि सिलिंडरचे वितरण साधारणपणे दोन ते तीन दिवसांत होत असे. परंतु आखाती युद्ध सुरू होताच ग्राहकांनी बुकिंगसाठी गर्दी केल्याचे एका एजन्सीच्या व्यवस्थापकांनी नमूद केले. दरम्यान, बुकिंगसाठी होणारी गर्दी व त्यातुलनेत होणारा पुरवठा कमी यामुळे ग्राहकांची प्रतीक्षा यादी वाढतच गेली. तिन्ही कंपन्यांच्या एजन्सीकडे साधारणपणे ४० ते ५० हजारांच्या आसपास बुकिंग असल्याचेही जिल्हा पुरवठा विभागाच्या सूत्रांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT