Purna Gas Shortage | पूर्णा येथे गॅस एजन्सीचा गोंधळ; सिलेंडरसाठी ग्राहकांच्या आठ दिवसांपासून रांगा

एजन्सीकडून जाणीवपूर्वक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण केला जात असल्याचा नागरिकांचा आरोप
Purna LPG cylinder Shortage
मागील आठ दिवसांपासून ग्राहकांना सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेतPudhari
Published on
Updated on

LPG cylinder queues Parbhani news

पूर्णा : शहरातील महावीर नगर परिसरातील इंडेन गॅस एजन्सीतील अनियमित कारभारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. एजन्सीकडून जाणीवपूर्वक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मागील आठ दिवसांपासून ग्राहकांना सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत.

अधिकृत मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन नोंदणी केल्यानंतर ग्राहकांना बुकिंगचा संदेश मिळतो; मात्र त्यानंतर दहा-बारा दिवस उलटूनही डिलिव्हरीचा संदेश येत नसल्याने सिलेंडर मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. एकीकडे आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे गॅस पुरवठा उशिरा होत असल्याचे कारण सांगितले जाते, तर दुसरीकडे सिलेंडर उपलब्ध असल्याचेही सांगितले जात असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात रांगा का लागत आहेत, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.

Purna LPG cylinder Shortage
Parbhani News | संजय गांधी निराधार योजनेच्या अशासकीय समितीच्या नियुक्त्यांना स्थगिती

एजन्सी व्यवस्थापनाकडून पुरेशा गांभीर्याने पुरवठा केला जात नसल्याने ग्राहकांना अनेक वेळा रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. वेळेत गॅस मिळत नसल्यामुळे घरगुती वापरकर्ते तसेच हॉटेल व्यावसायिकांना पर्यायी इंधनाचा वापर करावा लागत असून काही ठिकाणी लाकडी चुली पुन्हा पेटताना दिसत आहेत.

दरवाढीचा अतिरिक्त बोजा

दरम्यान, घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत ६० रुपयांनी, तर व्यावसायिक सिलेंडरमध्ये ११५ रुपयांची वाढ झाल्याने ग्राहकांच्या खर्चात भर पडली आहे. महागाईच्या पार्श्वभूमीवर वेळेत गॅस न मिळाल्याने नागरिक अधिकच हैराण झाले आहेत.

मी बारा दिवसांपूर्वी मिस्ड कॉलद्वारे बुकिंग केले; मात्र अद्याप डिलिव्हरीचा संदेश मिळालेला नाही. त्यामुळे रोज एजन्सीकडे फेऱ्या माराव्या लागत आहेत. घरातील गॅस संपल्याने स्वयंपाक करणेही कठीण झाले आहे.

उमेश झरकर, ग्राहक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news