Queue for admission to Municipal Corporation's CBSE school
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: शहरात महापालिकेच्या मराठी, उर्दू माध्यमच्या शाळा आहेत. त्यासोबतच मागील काही वर्षापासून महापालिकेने सीबीएसई अभ्यासक्रमही सुरू केला असून, यंदाच्या शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या सीबीएसई प्रवेशासाठी पालकांच्या रांगा लागत आहेत.
शहरात सध्या महापालिकेच्या मराठी आणि उर्दू माध्यमच्या ५६ शाळा आहेत. तर आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून स्मार्ट स्कूल टू वेस्ट स्कूल या योजनेअंतर्गत ६ सीबीएसई शाळा सुरू आहे. गेल्या वर्षी पालकांचा उत्साह पाहून महापालिकेने सीबीएसईच्या शाळांची संख्या वाढवली होती.
यंदाही मनपाच्या या शाळांमध्ये ज्युनिअर केजी या वर्गाच्या प्रवेशासाठी रांगा लागत आहे. सोमवारी उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेशासाठी फॉर्म वितरण करण्यात आले. त्यासाठी विविध ठिकाणी रांगा लागल्या होत्या. आजही प्रवेश फॉर्म वितरित केले जाणार आहे.
महापालिका शिक्षण विभाग येणाऱ्या अर्जाची छाननी करून यात प्रत्येक शाळेसाठी ४० विद्यार्थी लक्की ड्रॉद्वारे निवडणार आहे, अशी माहिती सीबीएसई समन्वयक शशिकांत उबाळे यांनी दिली.
गारखेडा सीबीएसई शाळा-७३ उस्मानपुरा सीबीएसई-११७, प्रियदर्शनी सीबीएसई ४३, सिडको एन-११ सीबीएसई -४८, सिडको एन-७ सीबीएसई ४४, चेलीपुरा सीबीएसई-२०१,