Sambhajinagar Crime News : भररस्त्यात लूटमार, भाईगिरी करत चाकूहल्ला

गाडे चौकात भोसकले; पुंडलिकनगरात लुटले
Sambhaji Nagar Crime News
Chhatrapati Sambhajinagar News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या जेवणावर अधिकाऱ्यांचा डल्लाFile photo
Published on
Updated on

The number of knife attacks, gang violence, and bullying on the streets of the city has increased

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरात भररस्त्यात चाकूहल्ले, भाईगिरी, दादागिरी करणाऱ्यांची संख्या वाढली असून, गाडे चौकात पैशाची मागणी करत तरुणाला एकाने चाकूने भोसकून जखमी केले. तर पहाटे घराकडे निघालेल्या तरुणाला मी इथला दादा आहे, पैसे दे म्हणत चाकूने वार करून पुंडलिकनगरात लुटले. या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Sambhaji Nagar Crime News
Chhatrapati Sambhajinagar : धाराशिव-छत्रपती संभाजीनगर मार्गाचे पुनर्सर्वेक्षण करुन काम तत्काळ सुरु करा

फिर्यादी दिलीप अंबादास पटेकर (४२, रा. फुलेनगर, उस्मानपुरा) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ नितीन अंबादास पटेकर (३२) हा मजुरी काम करतो. शनिवारी रात्री दिलीप याना काही मुलांनी येऊन तुमच्या भावाला गाडे चौकात एकाने चाक मारला असल्याचे सांगितले. दिलीप धावत गेले. तेव्हा जखमी नितीन याना त्यांचे मित्र प्रेम संजय खरे आणि सुरज भालेराव है दुचाकीवर घेऊन जवळच्या हॉस्पिटल येथे गेल्याचे समजले.

दोघांनी सांगितले की, नितीन हा रात्री साडेनऊच्या सुमारास नितीन त्याचा मित्र समाधान मिसाळ सोबत मोपेडने जात असताना आरोपी आकाश हिवाळे याने त्यांना थांबिवले. दादागिरी करत नितीनकडे पैशाची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुझा मर्डरच करतो अशी धमकी दिली. खिशातून चाकू काढून नितीनच्या पोटात उजव्या बाजूला भोसकून गंभीर जखमी केले.

Sambhaji Nagar Crime News
Chhatrapati Sambhajinagar : आयटीआय प्रवेश नोंदणीला ओहोटी

नितीन याच्या पोटातून रक्त निघत असल्याने आकाश तेथून शिवीगाळ करून पळून गेला. लोकांनी आकाशला पकडणायचा प्रयत्न केला. पण अंधारात तो पसार झाला. त्यानंतर जखमी नितीनला जवळच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. याप्रकरणी आर-रोपी आकाश हिवराळे विरुद्ध वेदांत नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक प्रविणा यादव यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक वैभव मोरे, सहायक फौजदार अरुण वाघ, अंमलदार प्रवीण मुले, शिवाजी होडशिळे यांच्या पथकाने आरोपी आकाश शिवाजी हिवाराळे (२८, रा. एकनाथ नगर) याला उस्मानपुरा भागातून अटक केली.

त्याच्याविरुद्ध यापूर्वी जवाहरनगर, उस्मानपुरा ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. सोमवारी (दि.२३) त्याला न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची (२७ जूनपर्यंत) पोलिस कोठडी सुनावली.

मी कांच्या दादा म्हणत चाकूहल्ला

फिर्यादी सागर प्रकाश भिसे (२०,रा. ह. मु. अंधेरी, मुंबई, मूळ मोतीनगर) हा रविवारी (दि.२२) मुंबई येथून पहाटे ट्रॅव्हलसने सिडको चौकात उतरला. तेथून रिक्षाने तो गोकुळ स्वीटपर्यंत आला. तेथून पायी तो शिवाजीनगर रस्त्याने घराकडे निघाला. पहाटे पावणेपाचच्या सुमारास शिव-ाजीनगर रस्त्यावरील देशी दारूच्या दुकानासमोर अल्पवयीन आरोपी कांच्या समोर आला. त्याने चाकूचा धाक दाखवून किती पैसे आहेत ते मला दे, असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण सुरू केली.

मला कांच्या दादा म्हणतात, असे म्हणून त्याने सागरच्या खिशातून पाचशे रुपये काढून घेत असताना त्याला विरोध केला. कांच्याने सागरच्या पायावर दोन ठिकाणी चाकूने वार करून जखमी केले. किती पैसे आहे ते मला दाखव म्हणत पोटात चाकू मारण्याचा प्रयत्न केला, सागर मागे सरकल्याने तो वार हुकला. कांच्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने चाकूचा धाक दाखवून पाचशे रुपये घेऊन पसार झाला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी एपीआय शिवप्रसाद कन्हाळे यांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. त्याची सुधार गृहात रवानगी झाली. महिनाभरापूर्वीही त्याने लूटमार केली होती, असे पोलिसांनी सांगितले.

चौकात खुनाची घटना घडली आणि अतिक्रमणामुळे हा प्रकार घडल्याचे कळताच पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांनी संयुक्तरीत्या मुकुंदवाडीत मोहीम राबवून येथील तब्बल २२९ अतिक्रमणावर बुलडोजर चालविला. दिवसभर राबविलेल्या मोहिमेनंतर महापालिकेने शुक्रवारी सायंकाळी येथील व्यावसायिक व निवासी नागरिकांना स्वतः हून अतिक्रमण काढण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली.

त्यानुसार सोमवारी कारवाई अपेक्षित होती, परंतु सोमवारी जनअक्रोश मोर्चा असल्याने पोलिस यंत्रणा मोर्चाच्या बंदोबस्तात व्यस्त होती. त्यामुळे आज मंगळवारी ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news