मॉल्स, शोरूम, हॉस्पिटल्स, कोचिंग क्लासची सुरक्षा वाऱ्यावर file photo
छत्रपती संभाजीनगर

मॉल्स, शोरूम, हॉस्पिटल्स, कोचिंग क्लासची सुरक्षा वाऱ्यावर

मनपाचे फायर ऑडिटकडे दुर्लक्ष, २ हजारांवर व्यावसायिक मालमत्ता धोकायदायक

पुढारी वृत्तसेवा

Question mark over safety of malls, showrooms, hospitals, coaching classes

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

महापालिका शहरात नव्या व्यावसायिक बांधकामांना परवानगी देताना प्रायोगिक तत्त्वावर अग्निशमन परवानगी देते. तर बांधकाम पूर्णत्वानंतर अग्निशमन दल या फायर सेफ्टीची तपासणीही करते. मात्र एकदा परवानगी घेतली की, त्यानंतर हे उपकरण सुरू आहेत की बंद याकड प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष होते अन् आगीच्या दुर्घटनेनंतर, पुन्हा शोरूम, मॉल्स, हॉटेल्स, हॉस्पिटल्स आणि कोचिंग क्लासेसचे फायर ऑडिट ऐरणीवर येते. शहरात अशी तब्बल २ हजारांहून अधिक धोकायदायक व्यावसायिक मालमत्ता असून, त्यात ८२ हॉस्पिटल्सचा समावेश आहे.

शहरातील अनेक व्यावसायिक मालमत्तांधारकांनी बांधकाम परवानगीसोबत फायर एनओसी घेतलेल्या नाहीत. यात प्रामुख्याने जुन्या शहरातील बांधकामांचा समावेश आहे. त्यामध्ये मोठी दुकाने, शोरूम, हॉटेल्स, बार-रेस्टॉरंट, हॉस्पिटल्स आणि कोचिंग क्लास, खासगी हॉस्टेल्स यांचा समावेश आहे. गेल्याच वर्षी शहागंज भागातील दोन मजली मोठे किराणा मॉल आगीत राख झाले होते.

यात सुमारे १२ ते १८ कोटींहून अधिकचे नुकसान दाखिवण्यात आले होते. दुकानातील संपूर्ण किराणा माल आगीत खाक झाला होता. एवढेच काय तर छावणीतील एका टेलरच्या दुकानाला आग लागल्याने तब्बल सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटनाही घडली होती.

या दुर्घटना घडल्यानंतर महापालिका प्रशासनाला खरबडून जाग येते. त्यानंतर धोकादायक व्यावसायिक इमारतींकडील फायर सेफ्टी उपकरणांच्या तपासणीचे आदेश दिले होते. या आदेशावर केवळ आठवडाभरच गांभीर्याने चर्चा होते अन् त्यानंतर आयुक्तच्च काय तर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा त्यास बगल देत पुढे निघते. रविवारी गजानन हॉस्पिटलला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर महापालिका प्रशासन पुन्हा एकदा जागी झाले आहे. आता शहरात पुन्हा फायर ऑडिटवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

६ वर्षांपासून ऑडिटची चर्चाच

शहरातच काय तर राज्यात आणि देशात कुठे आगीची मोठी दुर्घटना घडली की, महापालिकेकडून फायर ऑडिटचा मुद्दा ऐरणीवर आणला जातो. गेल्या ६ वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू आहे. कोर-ोना काळात नाशिक, विरारमध्ये हॉस्पिटलमध्ये आगीची घटना घडल्यानंतर शहरातही हॉस्पिटल, कोचिंग क्लासचे फायर ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु त्यानंतर दोन आठवड्यांतच यास केराची टोपली दाखविण्यात आली होती.

१२८ हॉस्पिटलकडेच अंतिम एनओसी

HOSPITAL शहरात ५२६ खासगी रुग्णालये, ४५ बाल रुग्णालये अशी ५७१ लहानमोठी हॉस्पिटल्स आहेत. त्यातील ३४३ हॉस्पिटल व्यस्थापनाकडून अग्निशमन विभागाला एनओसीसाठी संचिका दाखल करण्यात आली आहे. त्यातही २७१ हॉस्पिटलला प्राथमिक आणि १२८ हॉस्पिटलला अंतिम एनओसी १२८ दिली आहे.

दुकाने, हॉटेल्सची आकडेवारीच नाही

शहरातील किती मोठी दुकाने, हॉटेल्स आणि शोरूमकडे फायर एनओसी आहे, याबाबत अग्निशमन विभागाकडे आकडेवारीच उपलब्ध नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT