Professor Murder Case : हत्येच्या रात्री नेमके काय घडले ? File Photo
छत्रपती संभाजीनगर

Professor Murder Case : हत्येच्या रात्री नेमके काय घडले ?

प्राध्यापक पित्याची निघृण हत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. हे प्रकरण चर्चेचे ठरले होते.

पुढारी वृत्तसेवा

Professor Murder Case: What exactly happened on the night of the murder?

छत्रपती संभाजीनगर : प्राध्यापक पित्याची निघृण हत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. हे प्रकरण चर्चेचे ठरले होते.

रात्री ११ वा : मित्रासोबत बाहेर जेवण करून प्राध्यापक घरी आले. पत्नी आणि मुलगी बैठक खोलीत टीव्ही पाहत होत्या. मध्यरात्री १:१५: पत्नी आणि मुलगी झोपायला खोलीत गेल्या. मुलगा स्टडीरूममध्ये एकटाच होता.

मध्यरात्री २ वाजता वादाची सुरुवात :

प्राध्यापक अंथरुणावरून उठले आणि त्यांनी मुलाला मुलाला पाहून नेहमीप्रमाणे टोमणे मारले, नेहमी मोबाईलवर गेम खेळतो, तुमच्यामुळे माझी समाजात बदनामी होतेय. आता तुला संपवूनच टाकतो ! वडिलांच्या या धमकीवर मुलाने मीच तुम्हाला संपवतो, असे म्हणत रागाला वाचा फोडली. दोघांमध्ये बराचवेळ वाद झाला, त्यानंतर प्राध्यापक झोपी गेले.

मध्यरात्री २:३० ते २:४५ (हत्येची तयारी): वडिलांना गाढ झोप लागल्याचे पाहून, वालकाने स्टोअररूममध्ये जाऊन ७.२५ किलोचा डंबेल्स आणला. डंबेल्सने मुलाने गाढ झोपेत असलेल्या वडिलांच्या डोक्यात डाव्या बाजूने दोन्ही हाताने तब्बल पाचवेळा वार केले. या ताकदीच्या वारांमुळे प्राध्यापकाचा कानही कापला गेला.

गळा चिरलाः वडील बेशुद्ध झाले असतील असे वाटून मुलाने स्वयंपाक खोलीतून चाकू आणला. चाकूने दोन्ही हाताच्या नसा कापून मग गळाही चिरला.

पुरावे नष्ट करण्याचा कट

हत्येनंतर मुलगा हॉलीवूडची मर्डर मिस्ट्री ही वेब सिरीज पाहत होता आणि पुरावे कसे नष्ट करायचे याचा विचार करत होता. या सर्व प्रकारात त्याला पहाटेचे चार वाजले.

शस्त्रे फेकली: रक्ताने माखलेला चाकू आणि डंबेल्स टॉवेलमध्ये गुंडाळून त्याने बंगल्याच्या कंपाऊंडवॉलवरून उडी घेतली आणि घरापासून जवळच्या विहिरीत ती शस्त्रे टाकली.

शस्त्रे टाकून परत आल्यावर अंधारात त्याचा रक्तावरून पाय घसरला आणि तो इतका घाबरला की त्याला त्याच ठिकाणी लघुशंका झाली. त्यानंतर त्याने बाथरूममध्ये जाऊन कपडे आणि हातपाय धुतले.

पोलिसांचा तपास

प्राथमिक तपासात घरात बाहेरून कोणताही व्यक्ती आल्याचे समोर आले नाही.

फिरली. हत्येच्या संशयाची सुई कुटुंबीयांभोवतीच

मारेकऱ्याने घटनास्थळी कोणताही पुरावा मागे ठेवलेला नव्हता.

घरातील कोणतीही वस्तू तिच्या जागेवरून हलवण्यात आलेली नव्हती.

मुलगा अल्पवयीन असल्याने हत्येमागील कारणे आणि गुन्ह्याची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी पोलिसांनी मानसोपचार तज्ज्ञांचीही मदत घेतली.

विहिरीत रहस्य: घराजवळील विहिरीमध्ये हत्येचे महत्त्वाचे पुरावे दडल्याचा प्रबळ संशय पोलिसांना आला.

३५ फूट खोल विहिरीचे मनपाच्या मदतीने पाणी उपसा तीन दिवस सुरू होता.

हत्येची गुंतागुंत सोडविण्यात अखेर आठ दिवसांनंतर शहर पोलिसांना यश आले.

१८ ऑक्टोबर २०२१ : मुलाने दिलेल्या कबुलीनंतर सुमारे ६० तासांनी विहिरीतून रक्ताने माखलेल्या टॉवेलमध्ये गुंडाळलेला डंबेल्स आणि चाकू बाहेर काढण्यात यश आले.

मुलाची संशयास्पद कृती

नेहमी ९ वाजता उठणारा मुलगा, पहाटे ५ वाजता उठला.

रक्ताच्या थारोळ्यात वडील असताना त्याने कोणतीही आरडाओरड केली नाही.

मुलाने बहिणीला उठविले मात्र आईला काहीही न कळवताच शांतपणे रुग्णवाहिका आणण्यासाठी कारने घराबाहेर पडले.

एन-४ जवळ कारची रस्त्यावरील एका कारला धडक बसली. कार तिथेच सोडून बहिणीसोबत पळत हॉस्पिटलमध्ये गेला.

हॉस्पिटलमधून आणलेल्या रुग्णवाहिका चालकाने मृतदेह पाहून पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगत मृतदेह घेऊन जाण्यास नकार दिला. मुलाने चिश्तिया पोलिस चौकी गाठली. त्यानंतर नियंत्रण कक्षाला संपर्क केला. तोपर्यंत त्याच्या आईला कानोकान खबर नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT