Power to Change Attitudes in Akhand Harinam Week : Mahant Ramgiri Maharaj
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे, मनोवृत्ती बदल झाला तरच खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते, मनाची वृत्ती बदलण्याची ताकद फक्त अध्यात्मामध्ये व अखंड हरिनाम सप्ताहात आसल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.
श्री क्षेत्र देवगाव शनी व सप्तक्रोशी येथील योगीराज गंगागिरी महाराज १७८ वा अखंड हरिनाम सप्ताहातील चौथ्या दिवशीचे भगवद्गी तेच्या अकराव्या अध्यायातील श्लोकावर प्रवचन पुष्प गुंफतानी महाराज पुढे म्हणाले की, भगवंत भक्ताची जात बघत नाही जो भक्त भंगवताची भक्ती करतो त्याला तो प्राप्त होतो सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुध्दी होते एखादी वस्तू अतीदूर असली तर दिसत नाही डोळ्यातील अंजन स्वतःला दिसत नाही त्याप्रमाणे नास्तिकाला देव दिसत नाही, पण गंगागिरी महाराज भजनात भजनाने मनुष्याच्या जीवनात समाधान मिळते.
आज समाजाला अध्यात्माची फार मोठी गरज आहे, असे गंगागिरी महाराज म्हणालेयुवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता आध्यात्मिक मार्गावर चालल्यास तरुणाना चांगली दिशा मिळेल अशा दिशाहीन समाजाला योग्य दिशा देऊ कोण देत असेल तर ते फक्त अखंड हरिनाम सप्ताहाच देऊ शकतो. मनुष्य अज्ञान झाकण्यासाठी पाप करतो. योगीराज गंगागिरी महाराज यांनी अनेक भक्तांच्या जीवनातील दुः ख दूर करून सन्मार्गावर आणले महाराजांनी पारतंत्र्यात अनेक अडचणींना सामोरे जात वेळप्रसंगी माधुकरी मागवत कन्या व घुगऱ्या शिजवत समाजासाठी अन्नदान सुरू ठेवले मनाची वृत्ती बदलण्याची ताकद फक्त हरिनाम सप्ताहातच असल्याचे महाराज म्हणाले.
याप्रसंगी डॉ दिनेश परदेशी, पंचगंगा उद्योग समूहाचे प्रभाकर शिंदे, अनुराधा आदिक, कृष्णा डोणगावकर, डॉ. राजीव डोंगरे, नवनाथ महाराज मस्के, बाळासाहेब महाराज रंजाळे, उत्तम महाराज गाढे, अमोल महाराज गाढे, रामभाऊ महाराज, ब्रिकम महाराज, राजेश्र्वरगिरी महाराज, रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरी महाराज, शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज, योगानंद महाराज सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज यांच्यसह ४ ते ५ लाख भाविकांची उपस्थिती होती.
दररोज ३०० भाविकांचे रक्तदान
लोकमान्य बल्ड बँक, आदर्श ब्लड बँक, नित्य सेवा ब्लड बँक, सोलापूर ब्लड बँक अशा ४ रक्त-पेढी वतीने दररोजचे २५० ते ३०० भाविकांचे रक्त संकलन केले जाते.