Political poster boys are safe; Municipal Corporation files cases against small businessmen
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
शहरात अनधिकृत पोस्टर आणि बॅनरवरील कारवाईवेळी विजेचा धक्का लागून महापालिकेच्या एका तरुण कामगाराचा मृत्यू झाला. हा एक बळी गेल्यानंतर महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी अनधिकृत बॅनर आणि पोस्टर लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. परंतु या आदेशाच्या अंमलबजावणीतही अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या मपोस्टर बॉईजफ्ना अभय देत केवळ छोट्या व्यावसायिकांच्या पोस्टर आणि बॅनरविरोधात गुन्हे दाखल केल्याचा प्रकार मंगळवारी (दि. २४) उघडकीस आला.
महापालिकेच्या झोन क्रमांक ५ मधील अतिक्रमण निरीक्षक प्राप्ती जाधव यांनी सिडको पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून महॉटेल तरटेफच्या मालकाविर- ोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वच्छता जवान शंकर चव्हाण यांना मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास वेणूताई चव्हाण रोडवरील ओंकार गॅस एजन्सीजवळ अनधिकृत बॅनर लावलेले दिसून आले.
त्यांनी ही माहिती जाधव यांना कळविली. त्यानंतर जाधव यांनी पोलिसांत तक्रार दिली. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता, अनधिकृत बॅनर लावून महापालिकेच्या जाहिरात कराचे आर्थिक नुकसान केले आणि शहराचे विद्रुपीकरण केले, असे जाधव यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
शहराच्या विद्रुपीकरणात विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचाच सर्वाधिक सहभाग असल्याचे वारंवार आढळते. शहरातील असा एकही चौक किंवा रस्ता नाही, ज्याच्या कडेला पोस्टर आणि बॅनर नाहीत. प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आपल्या नेत्यांचे, तसेच मभाऊफ मदादांफ्चे मोठमोठे बॅनर मिळेल त्या जागेत लावतात. सध्याही अनेक ठिकाणी असेच राजकीय पोस्टर आणि बॅनर झळकत आहेत.
परंतु त्याविरोधात कारवाई करण्याची हिंमत महापालिकेचे अधिकारी दाखवत नाहीत. एका निष्पाप कर्मचाऱ्याचा बळी गेल्यानंतरही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून या मभाऊफ मदादांफ्ना अभय दिले जात आहे.
अनधिकृत बॅनर आणि पोस्टर लावणाऱ्यांनी ते २४ तासांत काढून घ्यावेत अन्यथा गुन्हे दाखल करणार, असा इशारा महापालिका आयुक्तांनी सोमवारी दिला होता. मात्र त्याची अंमलबजावणी करताना अधिकाऱ्यांनी राजकीय कार्यकर्त्यांना सोडून केवळ लहान व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.