Bor Dahegaon Dam news | बोर दहेगांव मध्यम प्रकल्पातून नदिपात्रात पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा विरोध

Chhatrapati Sambhajinagar | पाणी सोडण्यासाठी आलेल्या अधिकारी यांना आल्या पावली परत जावे लागले
Bor Dahegaon Dam news | बोर दहेगांव मध्यम प्रकल्पातून नदिपात्रात पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा विरोध
Published on
Updated on

परसोडा : वैजापुर तालुक्यातील बोर दरेगांव मध्यम प्रकल्पातून गावांसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याला दहेगाव, राहेगाव, गोळवाडी, बेंदवाडी परसोडा येथील शेतकऱ्यांनी सिंचन अभियंता यांना घेराव घालत नदिपात्रातुन पाणी सोडण्यास विरोध केला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रानुसार, जलसंपदा विभागाच्या साह्यक अभियंता सिंचन शाखा क्रमांक ८ वैजापुर यांनी दि २४ रोजी सकाळी नऊ वाजता ३०० ते ४०० कुसेक्सने बोर दहेगांव मध्यम प्रकल्पातून नदिपात्रात पाणी सोडून खालील भागात कोल्हापुरी बंधारा भरून देण्याबाबत दहेगांव, करंजगाव, खिर्डी, जळगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवाकां सुचित करण्यासाठी पत्र काढले. हे पत्र निघताच सकाळी आठ वाजता दहेगांव मध्यम प्रकल्पावर परीसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होऊन खालील गांवासाठी आरक्षित असलेले पाणी चादरीद्वारे सोडणे अपेक्षीत असताना ते नदीपात्रातुन सोडण्यास शेतकयांनी विरोध करीत शाखा अभियंता यांना घेराव घालत पाणी सोडण्यासाठी आलेल्या अधिकारी यांना आल्या पावली परत जावे लागले.

यावेळी गोळवाडीचे सरपंच विक्रम शिंदे, उपसरपंच श्याम पवार, भगवान छानवाल, शंकर मरमट, संदिप छानवाल,भीमसिंग पहाटे, अशोक चव्हाण, चंद्रकांत उगले, काकासाहेब पगार, बाबासाहेब शिंदे, बापुराव शिंदे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

नदी पात्रात पाणी सोडु नये या प्रकल्पांतर्गत अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या विहिरी असुन येथुन पाणी पुरवठा होतो. शासनाने नियमानुसार आरक्षित पाणी हे पोटचारीने सोडणे अपेक्षित आहे. नदिपात्रातुन पाणी सोडल्यास पाण्याची नासाडी होईल.यामुळे भविष्यात अनेक गावांना पाणी टंचाई निर्माण होऊ शकते.

- राजुसिंग छानवाल ( सरपंच परसोडा)

वरीष्ठांना अहवाल पाठवणार बोर दहेगांव प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व गावांचे शेतकरी जमा झाले. खालील गावातील शेतकरी पाणी सोडा सोडण्याची मागणी करीत होते तर वरील भागातील शेतकरी नदिपात्रातुन पाणी सोडू नका अशी भूमीका शेतकऱ्यांनी घेतेली सदरील प्रकरणाचा अहवाल वरीष्ठ अधिकाऱ्यांना पाठविणार आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news