बजाजनगरात पीएनजी गॅस गळती file photo
छत्रपती संभाजीनगर

PNG gas leak : बजाजनगरात पीएनजी गॅस गळती

बजाजनगर येथील हायटेक कॉलेज परिसरात सोमवारी (दि.६) सायंकाळी भूमिगत पीएनजी गॅसलाईनमधून अचानक गॅस गळती सुरू झाल्याने परिसरात खळबळ उडाली.

पुढारी वृत्तसेवा

PNG gas leak in Bajaj Nagar

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : बजाजनगर येथील हायटेक कॉलेज परिसरात सोमवारी (दि.६) सायंकाळी भूमिगत पीएनजी गॅसलाईनमधून अचानक गॅस गळती सुरू झाल्याने परिसरात खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीज पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला असून, अग्निशमन दलानेही घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, भूमिगत गॅसलाईनमधून गळती सुरू झाल्याने लगतचे सिमेंट गट्टही गरम झाले होते. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसीचे उपअभियंता गणेश मुळीकर, तांत्रिक सहाय्यक प्रशांत सरोदे, महावितरणचे अधिकारी तसेच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. यानंतर संबंधित गॅस कंपनीला माहिती देण्यात आली.

कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ गॅस पुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेतले. रात्री उशिरापर्यंत दुरुस्ती सुरू होती. उपअभियंता गणेश मुळीकर यांनी सांगितले की, गळती झालेल्या गॅस लाईनवर अद्याप कोणालाही कनेक्शन देण्यात आलेले नव्हते. माहिती मिळताच कंपनीने तत्काळ गॅस पुरवठा बंद करून आवश्यक उपाययोजना केल्या.

हायटेक कॉलेज परिसरातील भूमिगत पीएनजी गॅसलाईनमधून गळती सुरू झाल्याची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ खबरदारीची पावले उचलली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT