Sambhajinagar News : शहरात एकाच रात्री दोन ठिकाणी अग्नितांडव

इंदिरानगरात सिलिंडरचा स्फोट, तर विशालनगरात गळतीने आग
Sambhajinagar News
Sambhajinagar News : शहरात एकाच रात्री दोन ठिकाणी अग्नितांडवfile photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात मंगळवारी (दि.३०) रात्री अवघ्या सव्वातासाच्या अंतराने दोन ठिकाणी आगीच्या भयंकर घटना घडल्या. इंदिरानगर येथे गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन एका घराचे मोठे नुकसान झाले, तर न्यू विशालनगरमध्ये गॅस गळती आणि शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागली. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सिडको अग्रिशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आगीचा मोठा अनर्थ टळला.

Sambhajinagar News
Jalna News : शहरातील अंदुरे कुटुंबातील सख्ख्या तीन भावांचे संसार जळून खाक

अधिक माहितीनुसार, मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास न्यू विशाल नगर परिसरातील नायरा पेट्रोल पंपाच्या बाजूला एका घरात गॅस सिलिंडरची गळती आणि शॉर्टसर्किट झाल्याने अचानक आग भडकली. आगीची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको उप अग्रिशमन केंद्र अधिकारी विजय राठोड, विनायक कदम, ड्यूटी अधिकारी चेतन तरोळे, अनिशमन जवान आकाश नेरकर, विशाल निंबाळकर आणि वाहनचालक विजय दुबेले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग पूर्णपणे विझवली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.

Sambhajinagar News
Nanded Fire News : नांदेड बसस्थानकावरील हाॅटेलला भीषण आग; ७ लाखांचे नुकसान

स्फोटाचा भयंकर आवाज, परिसरात घबराट

पहिल्या घटनेची धग शांत होत नाही तोच, रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास इंदिरानगर येथे दुसरी धक्कादायक घटना घडली. येथील एका घरात गॅस सिलिंडरचा जोरदार स्फोट होऊन घराला भीषण आग लागली. स्फोटाचा आवाज भयंकर असल्याने परिसरात घबराट पसरली. या घटनेची माहिती मिळताच त्याच अनिशमन पथकाने तात्काळ इंदिरानगरकडे धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले. या भीषण स्फोटात सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी आगीत घरातील संसारोपयोगी साहित्याची राखरांगोळी होऊन घराचे पूर्ण नुकसान झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news