Crime News pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

fake chassis number car fraud | खोटा चेसिस नंबर टाकून विकली कार; नंतर साथीदारांना पाठवून केली लंपास

fake chassis number car fraud | खोटा चेसिस नंबर टाकून विकली कार; नंतर साथीदारांना पाठवून केली लंपास

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : इंजिन आणि चेसिस नंबरमध्ये खाडाखोड करून बनावट कागदपत्रांच्या आधारे साडेचार लाख रुपयांना धुंदाई ऑरा कार विकायची आणि पैसे खात्यात पडताच स्वतःच्या साथीदारांना पाठवून तीच कार खरेदीदाराच्या पार्किंगमधून चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. हा घटना ३ ते ९ ऑगस्टदरम्यान उस्मानपुरा परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या पाठीमागे असलेल्या अद्वैत अपार्टमेंटमध्ये घडली. कोल्हापूर येथील एका भामट्याने महिला व्यापाऱ्याकडून तब्बल साडेचार लाख रुपये उकळून ही हातचलाखी केली. याप्रकरणी समीर खान (रा. सर्वेश प्लाझा, शहापुरी, कोल्हापूर) आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध उस्मानपुरा पोलिसांत सोमवारी (दि.२६) फसवणूक वाहनचोरीचा गुन्हा दाखल झाला.

फिर्यादी गौरी आशिष देशपांडे (४१, रा. अद्वैत अपार्टमेंट, उस्मानपुरा) यांच्या तक्रारीनुसार त्यांनी आणि त्यांच्या भागीदाराने आरोपी समीर खान याच्याकडून ह्युदाई कंपनीची ऑरा कार (क्र. एमएच-०४-एमए-४९०२) खरेदी करण्याचा व्यवहार केला होता. या व्यवहारापोटी फिर्यादीने ४ ऑगस्ट २०२६ रोजी टोकन अमाऊंट म्हणून फोनपेद्वारे १० हजार रुपये दिले.

त्यानंतर ७ ऑगस्ट २०२६ रोजी बँक ऑफ बडोदाच्या खात्यावरून समीर खान याच्या स्टेट बँक ऑफ इंडिया (कोल्हापूर [IF शाखा) खात्यावर आरटीजीएसद्वारे ४ लाख रुपये पाठवले. उर्वरित ४० हजार रुपये ९ ऑगस्ट २०२६ रोजी पुन्हा ऑनलाईन पाठवण्यात आले. अशा प्रकारे फिर्यादीने कारपोटी समीर खान याला एकूण ४ लाख ५० हजार रुपये अदा केले. कारचा संपूर्ण व्यवहार पूर्ण झाल्यानंतर देशपांडे यांनी ती कार स्वतःच्या अद्वैत अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. मात्र,

दोघांवर उस्मानपुरा गुन्हा दाखल

त्यानंतर त्यांनी कारच्या अधिकृत हस्तांतरणासाठी समीर खान याच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला असता त्याचा फोन बंद येऊ लागला. दरम्यान, आरोपी समीर खान याने दोन अनोळखी इसमांना छत्रपती संभाजीनगरात पाठवून देशपांडे यांच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमधून ती कार परस्पर चोरून नेली. आरोपीने मुळात कारवर खोटा चेसिस नंबर आणि इंजिन नंबर टाकून, तिची बनावट कागदपत्रे तयार करून ती फिर्यादीला विकली होती. त्यानंतर पैसे उकळून स्वतःच पाठवलेल्या साथीदारांमार्फत ती कार पुन्हा गायब केली. या गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक बोटके करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT