Chhatrapati Sambhajinagar house burglary|शेंद्रा कमंगरमध्ये भरदिवसा घरफोडी; महिलेचे तासाभरात घर साफ

Daylight house burglary in Shendra Kamangar Sambhajinagar- अक्षदनगरातील घटना ; २ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास, चिकलठाणा पोलिसात गुन्हा दाखल
theft
theftPudhari
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : सकाळी अवघ्या एका तासासाठी चिमुरडीला शाळेत सोडण्यासाठी घराला कुलूप लावून गेलेल्या महिलेचे घर चोरट्यांनी दिवसाढवळ्या टार्गेट केले. फ्लॅटचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ३० हजार रुपयांची रोकड असा तब्बल २ लाख ३० हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शेंद्रा कमंगर परिसरातील अक्षदनगर येथे सोमवारी (दि. २६) सकाळी साडेनऊ ते साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

theft
Sambhajinagar Accident | नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ट्रक - दुचाकीची धडक; केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानासह तरूण जागीच ठार

शेंद्रा कमंगर येथील अक्षदनगर, बी-विंग, फ्लॅट नं. ३ मध्ये राहणारे खाजगी कंपनीतील कर्मचारी अक्षय योसेफ सोनवणे (३२) यांच्या तक्रारीनुसार, ते नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास कामावर गेले होते. त्यावेळी घरी त्यांची पत्नी व मुलगी होती.

theft
Graduate Constituency Election- छत्रपती संभाजीनगर पदवीधरमधून सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी

सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पत्नी मुलीला शाळेत सोडण्यासाठी घराच्या दरवाजाला कुलूप लावून बाहेर पडली. तासाभरानंतर सकाळी साडेदहा वाजता पत्नी घरी आली तेव्हा दरवाजाला लावलेले कुलूप गायब दिसले आणि दरवाजा अर्धवट उघडा दिसला. संशय आल्याने त्यांनी तात्काळ आरडाओरड केली असता शेजारी व कॉलनीतील नागरिक जमा झाले. आत जाऊन पाहिले असता बेडरूममधील लोखंडी कपाट उघडे होते, आतील कपडे अस्ताव्यस्त फेकलेले होते आणि कपाटातील लॉकर तोडून त्यातील ५ ग्रॅमची सोन्याची साखळी व पत्ता, ६.५ ग्रॅमचे सोन्याचे कानातले जोड, १.५ ग्रॅमची सोन्याची नथ, चांदीच्या पायातील साखळ्या, गोप आणि कंबरपट्टा, आणि कपाटात ठेवलेली ३० हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे उघडकीस आले. घरात झालेली चोरी पाहून सोनवणे यांच्या पत्नीला मोठा धक्का बसला व त्या रडू लागल्या.

घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांचे शेजारी पवन साठे यांनी तात्काळ अक्षय सोनवणे यांच्या कंपनीत धाव घेतली आणि त्यांना घरात चोरी झाल्याची माहिती देऊन घरी आणले. घरी येऊन पाहणी केल्यानंतर सोनवणे यांनी चिकलठाणा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल विजयसिंग जारवाल करत आहेत.

महिला इंटर्न डॉक्टरचा फ्लॅट फोडून ६५ हजारांचा ऐवज लंपास

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) वैद्यकीय शिक्षण घेऊन एमबीबीएसची इंटर्नशिप करणाऱ्या दोन महिला डॉक्टरांचा फ्लॅट फोडून चोरट्याने आयपॅड, आणि ४० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना खडकेश्वर परिसरातील 'मलखारे विहार' इमारतीमध्ये रविवारी (दि. २५) रात्री ९ ते १ वाजेच्या दरम्यान घडली. दोघी महिला डॉक्टर रात्री जेवणासाठी बाहेर पडल्याची संधी साधून अवघ्या काही तासांत चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून हा डल्ला मारला.

याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी डॉ. जिया वीरेंद्र दहिया (२३, रा. सध्या फ्लॅट नं. ३०१, मलखारे विहार, खडकेश्वर; मूळ रा. आर्यनगर, जि. सोनिपत, हरियाणा) यांच्या तक्रारीनुसार, त्या आणि त्यांची मैत्रीण डॉ. तन्नू परमार या दोघीही घाटी रुग्णालयात एमबीबीएसची इंटर्नशिप करत असून, खडकेश्वर येथील मलखारे विहार इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ३०१ मध्ये भाड्याने राहतात.

२५ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दोघीही फ्लॅटला कुलूप लावून बाहेर जेवण करण्यासाठी गेल्या होत्या. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास त्या परत आल्या असता, त्यांना फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा आणि कुलूप तुटून खाली पडलेले दिसले. दरवाजा उघडून आत पाहिले असता, घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते.

चोरट्याने बेडरूममध्ये शोध घेऊन पलंगावर ठेवलेला डॉ. जिया यांचा अभ्यासासाठी वापरला जाणारा महागडा आयपॅड आणि बॅगेतील पर्स उचकटून त्यामध्ये ठेवलेली ४० हजार रुपयांची रोख रक्कमही लंपास केली. पुढील तपास उपनिरीक्षक अशफाक शेख हे करत असून, इमारतीमधील व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news