ShivBhojan Thali  Pudhari Photo
छत्रपती संभाजीनगर

Shivbhojan Thali : जिल्ह्यातील शिवभोजन थाळीचे पैसे थकले

५ महिन्यांपासून निधीच नाही, ११२ केंद्रांसाठी महिन्याला २ कोटींचा खर्च

पुढारी वृत्तसेवा

Payments for the district's Shivbhojan Thali scheme are overdue

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शासनाने राज्यातील गरीब व गरजूंना केवळ १० रुपयांमध्ये पोटभर जेवण मिळावे यासाठी शिवभोजन थाळी सुरू केली. जिल्ह्यात ११२ केंद्र आहेत. त्यासाठी सुमारे २ कोटींचा निधी लागतो. मागील पाच वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून, कोरोना काळातही अनेकांना शिवभोजनमुळे पोटभर जेवण मिळाले. मात्र मागील सहा महिन्यांपासून या योजनेचा निधी रखडला आहे.

जिल्ह्यात एकूण ११२ शिवभोजन केंद्र आहेत. एका केंद्रात दररोज ७५ ते १५० ग्राहक जेवण करतात. एका थाळीचे दर १० रुपये आहे, तर राज्य शासन केंद्रचालकाला एका थाळीचे ४० रुपये अनुदान स्वरूपात अदा करते.

जिल्ह्यातील ११२ केंद्रांवर सुमारे ७,८०० थाळी देण्यात येतात. महिन्याला सुमारे २ लाख ३५ हजारांहून अधिक शिवभोजन थाळी वितरित होते. त्यासाठी शासनाकडून जिल्ह्याला २ कोटींचे अनुदान प्राप्त होते. फेब्रुवारीपासून म्हणजेच मागील पाच महिन्यांपासून जिल्ह्याला अनुदानाचा एक पैसाही शिवभोजन केंद्रचालकाला मिळालेला नाही.

शिवभोजन थाळीवर दरमहा २ कोटी २३ लाखांवर खर्च होतो. सध्या पाच महिन्यांपासून शिवभोजन केंद्रांसाठी निधी आलेला नाही. पाठपुरावा सुरू असून, लवकरच हा निधी प्राप्त होईल.
- प्रवीण फुलारी, पुरवठा विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT