Passengers at the ST stand, but buses on the road
फुलंब्री, पुढारी वृत्तसेवा: येथील वस्थानकात काही चालक-वाहकांच्या बेशिस्तपणामुळे प्रवाशांची धावपळ होत आहे. स्थानकात काही बस प्लॅटफॉर्म समोर उभी न राहता स्थानक परिसरात कुठेही उभी राहत असल्याने प्रवासी वैतागले आहेत. प्रवाशांन बसमागे पळत जावे लागत आहे. सकाळी १० वाजेपर्यंत हा प्रकार अनेक बसबाबत होत असल्याच्या तक्रारी आहेत.
प्रवाशी हे स्थानकात बाकड्यावर वसून बसची वाट पाहतात. साडेनऊ वाजता येथील वाहतूक नियंत्रक येतात. तो पर्यंत अनेक बस चालक व वाहक यांची मनमानी सुरु असल्याच्या तक्रारी आहेत. काही बसला गावांचे फलक देखील नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. येथे जवळपास हजाराच्या वर शैक्षणिक पास आहेत. पाश्री, खामगाव व कोलते टाकळे येथील महाविद्यालयात शिक्षणासाठी विद्याथी जातात. अनेक बस वाहक पाथ्री, खामगाव फाटा येथील पासधारकांना बसमध्ये चढूच देत नाही येथे बस थांबा नाही असे उत्तर दिले जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या पासधारकांत मुलींची संख्या जास्त आहे. काही बसमध्ये तर सिल्लोड शिवाय मधला एकही प्रवाशी घेतला जात नाही. सकाळी सर्व प्रवाशांना आपआपल्या कामासाठी बसने जायचे असते.
स्थानकात आल्यावर त्यांचा त्रास कमी होण्याऐवजी वाढत आहे. बस स्थानकात थांबत नसल्याने रस्त्यावर थांबलेल्या बसच्या मागे पळत जावे लागते. अनेकदा कोणत्या गावाला जाणारी बस आहे याचा अंदाज येत नसल्याने तेथेपर्यंत जावे लागते व निराश होत परत माघारी यावे लागते. दरम्यान, फुलंब्री वस स्थानकात एसटी महामंडळाच्या बस निश्चित केलेल्या जागेवर उभ्या कराव्यात यासाठी वरिष्ठांनी चालक, वाहनांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात अशी मागणी होत आहे.
महामंडळाच्या काही चालक वाहकांच्या मनमानी मुळे छत्रपती संभाजीनगर शहर बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे थोडे पैसे जातात मात्र प्रवास वेळेत व सुरक्षित होतो अशी भावना प्रवाशांतून व्यक्त होत आहे.