Paithan MIDC Fire
पैठण : तालुक्यातील पैठण एमआयडीसी परिसरातील भगवती केमिकल कंपनीला शनिवारी दि.१४ रोजी आग लागली असून सुदैवाने आगीत कुठलीही हानी झालेली नाही मात्र आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाकडून दिली जात आहे. दिवसेंदिवस या परिसरातील केमिकल कंपनीला आगी लागण्याच्या घटनेत वाढ होत असून या आगी मध्ये इनकोर हेल्थकेअर केमिकल कंपनीत एका कामगाराला आपला जीव गमवावा लागला होता.
यावेळी या कंपनी व्यवस्थापनाकडून झालेल्या घटनेची तक्रार काही दिवसानंतर देण्यात आली. यामुळे या एमआयडीसी परिसरातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या केमिकल कंपनीमध्ये महिन्याभरात तीन केमिकल कंपनीत आग लागल्याच्या घटना घडल्या असून या घटनेतील शालिनी केमिकल या कंपनीच्या व्यवस्थापनाने देखील आगीच्या घटनेची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात दाखल केलेली नाही.
आगीची घटना घडल्यावर कंपनी व्यवस्थापनाकडून एमआयडीसी पोलीस व अग्निशमन दल जवानांचा बळाचा वापर तात्काळ केल्या जातो परंतु सदरील घटनेची तक्रार दाखल करण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाकडून टाळाटाळ करत असल्यामुळे या परिसरातील कामगारांमध्ये उलट सुलट चर्चेला उधान आले आहे.
दरम्यान पैठण एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकल निर्माण करणाऱ्या कंपनी असून एका महिन्यात तीन केमिकल कंपनीला आग लागल्याची घटना घडली यातील इनकोर हेल्थकेअर केमिकल कंपनीत एका कामगाराचा मृत्यू झाला होता. या कंपनीत लागलेल्या आगी संदर्भात कंपनी व्यवस्थापनाने तब्बल दोन आठवड्यानंतर १३ कोटी रुपयाहून अधिक नुकसान झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. काही कंपनीमध्ये आगीच्या घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसून सदरील व्यवस्था कागदपत्रे असल्याचे निदर्शनास येत असल्याने संबंधित केमिकल कंपनी व्यवस्थापनाला नोटीस देऊन व संयुक्त बैठक घेऊन सदरील कंपनीत आग आटोक्यात आणणारी यंत्रसामुग्री व्यवस्था ठेवून घटनेची तक्रार तात्काळ पोलिस ठाण्यात दाखल करावी यासाठी कंपनी व्यवस्थापनाची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसी सहाय्यक पोलिस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी दिली आहे.