Organ Donation : किडनी प्रत्यारोपण : ब्रेनडेड शिक्षकाच्या अवयवदानामुळे दोघांना मिळाले नवजीवन file photo
छत्रपती संभाजीनगर

Organ Donation : किडनी प्रत्यारोपण : ब्रेनडेड शिक्षकाच्या अवयवदानामुळे दोघांना मिळाले नवजीवन

मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये या दोन रुग्णांवर शनिवारी (दि. २) ब्रेनडेड शिक्षकाच्या किडन्यांचे प्रत्यारोपण करण्यात आले.

पुढारी वृत्तसेवा

Organ Donation by Brain-Dead Teacher Gives New Life to Two People

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा परभणी येथील ५७ वर्षीय ब्रेनडेड शिक्षकाच्या अवयवदानातून नांदेड आणि बीडमधील प्रत्येकी एक अशा दोन किडनी आजाराने त्रस्त रुग्णांना नवे जीवन मिळाले आहे. येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये या दोन रुग्णांवर शनिवारी (दि. २) ब्रेनडेड शिक्षकाच्या किडन्यांचे प्रत्यारोपण करण्यात आले.

पाथरी (जि. परभणी) येथील या शिक्षकास तेथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेथ घोषित केले. दरम्यान, संभाजीनगरात संबंधित रक्तगटाचे किडनी प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत असलेले रुग्ण असल्याची माहिती मिळताच अवयवदानाची प्रक्रिया तातडीने राबविण्यात आली.

यासाठी हॉस्पिटलचे किडनी प्रत्यार-ोपण तज्ज्ञ डॉ. मयूर दळवी हे परभणीत दाखल झाले होते. ग्रीन कॉरीडोरव्दारे ब्रेनडेड शिक्षकाच्या दोन्ही किडन्या संभाजीनगर शहरात येताच मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये डायलेसिसवर असलेले नांदेड येथील ५८ वर्षीय रुग्ण आणि बीड येथील ४८ वर्षीय रुग्ण या दोघांवर किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. तसेच या प्रत्यारोपण प्रक्रियेत सर्जन म्हणून डॉ. शरद सोमाणी यांनी काम पाहिले. तर ट्रान्सप्लांट फिजिशियन म्हणून डॉ. सचिन सोनी आणि डॉ. राहुल रुईकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली

प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी हॉस्पिटलमध्ये अनेक महिन्यांपासून नांदेड जिल्ह्यातील एक ५८ वर्षीय आणि बीड येथील ४८ वर्षीय रुग्ण डायलेसिसचे उपचार घेत होते. परभणी येथील ब्रेनडेड शिक्षकाच्या अवयदानानंतर हॉस्पिटलमध्ये या दोघांवर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.
-डॉ. विशाल कुटे, सेंटर हेड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT