एसीच्या शॉर्टसर्किटमुळे गजानन हॉस्पिटलमध्ये आग

९ रुग्णांना इतरत्र हलविल्याने जीवित हानी टळली; अग्निशमनच्या ३ बंबांनी विझवली आग
sambhajinagar news
एसीच्या शॉर्टसर्किटमुळे गजानन हॉस्पिटलमध्ये आगfile photo
Published on
Updated on

Fire breaks out at Gajanan Hospital due to AC short circuit

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गजानन महाराज मंदिर परिसरातील गजानन क्रिटिकल केअर हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरील आयसीयू विभागात रविवारी (दि. २९) रात्री ७:३० वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने अग्रिशमन दलाची तत्परता आणि हॉस्पिटल प्रशासनाच्या सतर्कतेमुळे ९ रुग्णांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली. आगीमुळे हॉस्पिटलमध्ये प्रचंड धूर कोंडल्या गेल्याने श्वास घेणे कठीण झाले होते. अग्निशमन जवानांनी अगोदर खिडकीच्या काचा फोडून धुराला वाट करून दिली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविले.

sambhajinagar news
जमीन करमाडची, मालक हैदराबादचे अन् तिरुपतीची तोतया महिला

मिळालेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरील आयसीयू विभागात बेड क्रमांक १ वरील एअर कंडिशनर (एसी) मध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन स्पार्किंग झाली. काही वेळातच गादी आणि पडद्यांनी पेट घेतल्याने परिसरात धुराचे लोट पसरले. घटनेची माहिती मिळताच पदमपुरा अग्रिशमन केंद्राचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग लागल्यानंतर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी पाच आयसीयू रुग्ण आणि चार जनरल वॉर्डमधील अशा एकूण ९ रुग्णांना सुरक्षितरीत्या वैद्यनाथ हॉस्पिटल येथे स्थलांतरित केले.

अग्रिशमन दलाच्या जवानांनी ऑक्सिजन मास्क आणि टॉर्चच्या सहाय्याने धुराच्या लोटात शिरून खिडक्यांच्या काचा फोडल्या आणि व्हेंटिलेशन केले. अर्ध्या तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले. हॉस्पिटलमध्ये अग्निशमन दलाचे एनओसी तसेच अंडखाउंड आणि ओव्हरहेड वॉटर टैंक, होस रील अशा सर्व अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित होत्या. यामुळे सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी स्वतःहून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ही कारवाई मुख्य अग्रिशमन अधिकारी अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअग्निशमन अधिकारी विजय राठोड, गंगावणे, मोरे, अजिंक्य भगत, सचिन शिंदे, लक्ष्मण कोल्हे आणि पथकाने पार पाडली. पुंडलिकनगर ठाण्याचे एपीआय शिवप्रसाद कन्हाळे आणि त्यांच्या पथकाने धाव घेऊन मदत केली.

sambhajinagar news
Crime News : कामावरून काढल्याच्या रागातून हॉस्पिटलवर टोळक्याचा हल्ला

सिडको वाहतूक शाखा आणि शहर पोलिसांच्या तत्परतेमुळे रुग्णांना बाहेर काढल्यानंतर ५ ते १० मिनिटांत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करणे शक्य झाले. पोलिसांनी इतर हॉस्पिटलशी समन्वय साधून सर्व यंत्रणा कामाला लावली. रुग्णवाहिका चालक, काही रिक्षाचालक आणि दुकानदार रुग्णालयासाठी देवदूत बनून मदतीसाठी घावले होते.

नऊ रुग्णांना वैद्यनाथ हॉस्पिटलला हलवले

गजानन रुग्णालयात आग लागली तेव्हा येथील आयसीयूत गंभीर पाच रुग्ण दाखल होते. तर खाली डिलक्स रूम २, तिसऱ्या मजल्यावरील जनरल वॉर्ड २ असे एकूण ९ रुग्ण उपचारासाठी दाखल होते. आगीचा डोंब उठताच या रुग्णांना तातडीने सिडको येथील वैद्यनाथ हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. आयसीयूचे रुग्णांना रुग्णवाहिकेव्दारे एक-एक करून हलविण्यात आले. तर जनरल वॉर्डातील रुग्णांना मिळेल त्या वाहनांनी वैद्यनाथ हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. यापैकी कुणालाही आगीची झळ बसली नाही, घटनेपूर्वी होती तशीच प्रकृती असल्याचे डॉ. गितेश दळवी यांनी सांगितले.

मानवी साखळी करून रुग्णांना हलविले

आगीमुळे हॉस्पिटलमध्ये प्रचंड धूर होता. लाईट बंद केल्याने लिफ्टने आणि स्ट्रेचरवरून रुग्णांना बाहेर काढणे कठीण झाले होते. रुग्णवाहिका चालकांनी आणि तेथील तरुणांनी मानवी साखळी तयार केली, गंभीर रुग्णांना पाठीवर घेऊन, काहींना हातांचा पाळणा करून तिसऱ्या मजल्यावरून खाली आणण्यात आले. रुग्णवाहिका चालकांनी रुग्णांना रस्त्यावर ताटकळत राहावे लागणार नाही याची काळजी घेऊन तातडीने फेऱ्या मारून त्यांनी सुरक्षितरीत्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पोहोचविले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news